ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2025 | बुधवार*
1. मुंबईतील दादरच्या कबुतरखान्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली, सार्वजनिक आरोग्याचा विचार करावा, पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचे स्पष्ट मत https://tinyurl.com/3vtuc45z दादरमधील कबुतरखाना बंदी समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आंदोलनासाठी पोहोचताच पोलिसांकडून धरपकड, जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद करुन घेतला https://tinyurl.com/yck9zyxp 'पोलिसांनी मला मारहाण केली, मराठी माणसाचं रक्त काढलं', 6 ऑगस्टला तुम्ही कुठे होतात? पोलिसांनी पकडल्यानंतर मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल https://tinyurl.com/ms4vyxvf
2. शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न, मारवाडी विरुद्ध मराठी वाद मिटवावा, निलेशचंद्र विजय यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आवाहन https://tinyurl.com/576xhuy3 आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाहीत हे दुर्दैव, आमच्यासाठी गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री, गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा हल्लाबोल https://tinyurl.com/49raxsx7 मराठी एकीकरणचा गोवर्धन देशमुख जाणून बुजून मराठी-मारवाडी वाद पेटवतोय, जैन मुनींचा दावा, म्हणाले आजच्या आंदोलनात फक्त 200-300 लोक! https://tinyurl.com/576xhuy3
3. कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/auvh2jxu शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्ध लढत नव्हते, ते मांसाहार करायचे; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत कडाडले https://tinyurl.com/2d7n9vxk
4. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापल्यानंतर बीडचे कलेक्टर ॲक्शन मोडवर,राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर गुन्हेगारांचा फोटो झळकल्यास गुन्हा दाखल होणार, होर्डिंगबाबत मोठा निर्णय https://tinyurl.com/3e6bhujy सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरु केली, पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्कील; म्हणाल्या, आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही https://tinyurl.com/3f62ej2p
5. मुंबईत अलिशान घर असतानाही धनंजय मुंडेंना 'सातपुडा' बंगला सुटता सुटेना; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सरकारला नोटीस पाठवणार; सरकारला संपूर्ण दंड वसूल करण्याचं आवाहन https://tinyurl.com/3huuvzuk मुंबईत स्वतःचं अलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यातून हलेनात, गिरगावच्या 16 कोटींच्या सी-फेसिंग व्ह्यू असलेल्या फ्लॅटची चर्चा https://tinyurl.com/5yrke3vf
6. भावाचा कलाकेंद्रात गोळीबार; राष्ट्रवादीचे भोरचे आमदार शंकर मांडेकर भावनिक, वारकरी समाजाची माफी मागितली https://tinyurl.com/3fknux53
अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, रोहित पवारांनी सांगितलं राज'कारण'; अजितदादांना ऑफर https://tinyurl.com/mvk89hym
7. स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची संधी न दिल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज, गोंदियातील ध्वजारोहणास नकार; 15 ऑगस्टसाठी आता शासनाचं नवं परिपत्रक https://tinyurl.com/5357kede लागबागचा राजा परिसरातील अग्निशमन बंबास दिवसाला सव्वा लाख भाडे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंडळास आश्वासन https://tinyurl.com/3jsxcenj
8. मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जिवाला धोका, राहुल गांधींची पुणे कोर्टात लेखी माहिती; दोघांचे नावही घेतले https://tinyurl.com/f4zuvmfm भारतीय नागरिक नसतानाही सोनिया गांधी मतदार होत्या; राहुल गांधींकडून मत चोरीचा आरोप सुरु असताना भाजपचा पलटवार https://tinyurl.com/538zcbp7 योगेंद्र यादव रुग्णालायतून थेट सुप्रीम कोर्टात अन् निवडणूक आयोगानं 'मतदारयादीत' मारलेली जिवंत माणसं याचि देही याचि डोळा सादर केली https://tinyurl.com/4ecu3hev
9. दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांवर बंदी घालण्यावर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार; सरन्यायाधीशांकडून आश्वासन https://tinyurl.com/2ccc4rmt
10. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना अडचणीत, बेटिंग प्लॅटफॉर्म प्रकरणी ईडीकडून समन्स; चौकशीसाठी हजेरी लावली https://tinyurl.com/mpe6fnj3 नोंदणी आणि उच्च सुरक्षा क्रमांक प्लेटशिवाय कार खरेदी केल्याचा आरोप, नवीन फॉर्च्युनर खरेदी करताच आरटीओने क्रिकेटपटू आकाश दीपला धाडली नोटीस; गाडी चालवली तर जप्त होणार https://tinyurl.com/4ks4v9xb अभिनेता अक्षय कुमारची SUV पोलिसांकडून जप्त; जम्मूमधल्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई
https://tinyurl.com/yz2rk6rs
*एबीपी माझा स्पेशल *
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद, नागपूर- पुणे प्रवासाचं तिकीट किती रुपयांना? जाणून घ्या https://tinyurl.com/4ecx5d7t
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























