ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2021 | बुधवार
1. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती, दुर्देवी घटनेत ऑक्सिजन अभावी 22 रुग्णांचा मृत्यू, तब्बल अर्धा तास हॉस्पिटलचा पुरवठा खंडित.. मृतांचा आकडा वाढण्याची भिती https://bit.ly/2QGbvRe चौकशीसाठी राज्य सरकारकडून तीन सदस्यीय समिती स्थापन https://bit.ly/2QGUg2m
2. नाशिकच्या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र शोकमग्न.. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दच नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया.. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार-नाशिक मनपाकडून प्रत्येकी पाच-पाच लाखांची मदत https://bit.ly/3tFhy75
3. नाशिकमधील घटना सुन्न करणारी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह राज्यातील नेत्यांकडून हळहळ https://bit.ly/3n8OItG 'राज्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठा, सुरक्षितता सुनिश्चित करा', उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश https://bit.ly/3xcEfSi
4. अहमदनगरमध्ये ऑक्सिजनअभावी आणीबाणी, शेवटच्या क्षणी टँकर पोहचल्याने अनर्थ टळला https://bit.ly/3grOzjF जिल्ह्यांना ऑक्सिजन, रेमडेसिवीरचं समान वाटप व्हावं, बाळासाहेब थोरात यांची भूमिका https://bit.ly/32ysVSz तर ऑक्सिजन वाटपात राजकारण न करण्याचं राधाकृष्ण विखे पाटील याचं आवाहन.. https://bit.ly/3v8c9pD
5. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा, यावर मंत्रिमंडळाचं एकमत असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा.. प्रस्तावित लॉकडाऊनमध्ये जिल्हा बंदी नसली तरी कठोर निर्बंध असणार https://bit.ly/2QN0c9N
6. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या किंमती जाहीर; सरकारी हॉस्पिटलसाठी 400 रुपये तर खासगी हॉस्पिटलसाठी 600 रुपये किंमत https://bit.ly/3gqPJvJ
7. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यावर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि महाविद्यालयांना पडलेला यक्षप्रश्न https://bit.ly/3n5b2Et
8. साताऱ्याची प्रियंका मोहिते ठरली माऊंट अन्नपूर्णावर तिरंगा फडकवणारी पहिली भारतीय महिला, बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ यांच्याकडून ट्वीटरद्वारे अभिनंदन https://bit.ly/3dDo8pq
9. सलमान खानचा 'राधे' थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी नवी योजना, 13 मे रोजी अनेक ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार https://bit.ly/2QKLXTa
10. पंजाबचं हैदराबादसमोर 121 धावांचं आव्हान, हैदराबादला पहिल्या विजयाची प्रतीक्षा https://bit.ly/3dC316N तर मुंबईच्या वानखेडेवर रंगणार चेन्नई विरुद्ध कोलकात्याचा मुकाबला https://bit.ly/3asRnsU
*ABP माझा ब्लॉग :* रडणाऱ्या 'इमोजीचा' महापूर!, पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3xdkJFq
*ABP माझा स्पेशल :*
WEB EXCLUSIVE : रेमडेसिवीरविना कोरोना रुग्णांना बरे करणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर https://bit.ly/3dH7sxj
Maharashtra Lockdown | लॉकडाऊन की कडक निर्बंध, नेमकं काय बदलणार? https://bit.ly/3tCYaaR
COVID-19 Vaccination | 18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन, कसा असेल आराखडा? https://bit.ly/32C9qZn
रेल्वे मंत्रालयाचा जिगरबाज Mayur Shelke यांना सलाम, 50 हजारांचं बक्षीस जाहीर! https://bit.ly/3ne1Nlh
Ram Navami 2021 : कुठे आकर्षक रोषणाई, तर कुठे सजावट; कोरोना संकटात राज्यात भक्तांविना रामनवमी उत्सव https://bit.ly/32xpdsa
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv