(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2024 | गुरुवार*
1. पुण्यात पावसाचा हाहाकार, निंबाजनगर, एकता नगर पाण्यात, अनेक घरं बुडाली, स्पीड बोटी लावून घरांमधून नागरिकांची सुटका, खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, रेडअलर्टमुळे शाळा, कार्यालयांना सुट्टी https://tinyurl.com/3xcnwpwd पुण्यात पावसाचे चार बळी; अंडा भुर्जीच्या स्टॉलवरील तिघांना शॉक, तर भोजनालयावर दरड कोसळून एकाचा मृत्यू https://tinyurl.com/ydehtfd8 सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा; एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना आदेश https://tinyurl.com/ms5ftnzh
2. मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, मुंबई-पुणे-मुंबई रेल्वेची वाहतूक आज आणि उद्या बंद; प्रवाशांचे हाल, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, मुंबईजवळच्या उल्हास नदीलाही पूर, लोकल वाहतुकीवरही परिणाम https://tinyurl.com/2f9tpnyd मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट, मुंबईभोवती पाणीच पाणी; मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली! https://tinyurl.com/emd6mpaz मुसळधार पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली, चार तलाव ओसंडून वाहू लागले, सोमवारपासून पाणीकपात मागे https://tinyurl.com/2ka2bj5e
3. 'पुण्यात पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही'; सुप्रिया सुळे संतापल्या, प्रशासनाच्या चुकीवर ठेवलं बोट https://tinyurl.com/3btdkrcs रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली, खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस; अजितदादांनी सांगितलं पुण्यातील जलप्रलयाचं कारण https://tinyurl.com/459xetkp
4. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, भोगावती नदीत 7212 क्युसेकने विसर्ग https://tinyurl.com/muxpz3pd कोल्हापूरवर महापुराची टांगती तलवार; पंचगंगा नदी किती फुटांवर गेल्यास पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी येतं? https://tinyurl.com/yc7cwmn6
5. कोणाशीही युती नाही, स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/2ycj9e33 मागे लढले तेव्हा एक आला होता आता बघू; राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका https://tinyurl.com/2a5chytk
6. मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला 'नो एन्ट्री', जाहिरातीमुळे महाराष्ट्रातून संताप, मनसे अॅक्शन मोडवर; कंपनीने पोलीस बंदोबस्त वाढवला https://tinyurl.com/54anh6ff मराठी माणसाला 'नो एन्ट्री' म्हणणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका, मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली https://tinyurl.com/3h898nr4
7. मी अजून राणे साहेबांना उत्तर दिलं नाही, निलेश राणेंनी त्यांच्या अंगावर घेऊ नये, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/mshvdrku मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलंय; भाजप नेते परिणय फुके यांची घणाघाती टीका https://tinyurl.com/3ac7jx9z
8. महाराष्ट्रात शेठजी-भटजींचं सरकार; राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार तीनच चेहरे आश्वासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mtv4s49k
'मविआच्या काळात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न'; शिंदे गटाचा अनिल देशमुखांवर जोरदार पलटवार https://tinyurl.com/56h9k35x
9. ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन; साहित्य आणि पर्यावरण चळवळीवर शोककळा https://tinyurl.com/yt3hncwv
10. भारताच्या लेकींची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत दमदार कामगिरी https://tinyurl.com/yhzuw544 श्रीलंकेला 24 तासात दुसरा धक्का,स्टार खेळाडू नुवान तुषारा मालिकेतून बाहेर, भारताचा सामना करताना मोठे आव्हान https://tinyurl.com/yfcd5saj
*एबीपी माझा स्पेशल*
पुण्याला 32 वर्षात पहिल्यांदा पावसाने एवढं धु- धु धुतलं, हवामान तज्ज्ञांची माहिती https://tinyurl.com/mvh3tahk
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w