ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2025 | शुक्रवार
1) राडेबाजी आणि हाणामारीने पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, आता 8 डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निकाल; राड्याप्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवर फौजदारी कारवाई https://tinyurl.com/3x389rkc सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडविरोधात गुन्हा दाखल, विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने गुन्हा https://tinyurl.com/mryye97c
2) राज्यातील जनता आपल्याला शिव्या देतेय, म्हणतेय, सगळे आमदार माजलेत; पडळकर-आव्हाड कार्यकर्त्यांच्या राड्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले https://tinyurl.com/bdfswa9d अध्यक्षांवर आरोप आणि हावभावानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव एक पाऊल मागे, सभागृह आणि विधानसभा अध्यक्षांची माफी मागितली https://tinyurl.com/mrxbndyw
3) मुंबईत ज्या डान्सबारमध्ये 22 बारबाला पकडल्या होत्या, तो डान्सबार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने, ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांचा खळबळनजक आरोप,मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी https://tinyurl.com/3bv94d68 विधिमंडळात जाण्यासाठीचे पास 5 ते 10 हजारांना विकले जातात; शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचा विधानपरिषदेत आरोप https://tinyurl.com/yc7trk46
4) उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, म्हणाले, एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिला नाही https://tinyurl.com/mr347c4k काहींचे दुधाचे दातही पडलेले नाहीत अन् आव आणतात; मंत्री दादा भुसेंची विधानसभेत आदित्य ठाकरेंवर टीका https://tinyurl.com/mr2y4fk7
5) मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा आमदार जितेंद्र आव्हाडांना इशारा, म्हणाले, तुम्ही धुतल्या तांदळाचे नाहीत https://tinyurl.com/3ye9bj4d आम्ही भाजपमध्ये काम करतो तो सुसंस्कृत पक्ष, हा मार खाणारा नाही तर सर्जिकल स्ट्राईक करणारा पक्ष, पाकिस्तानला सुद्धा माहिती, आमदार सदाभाऊ खोतांचं वक्तव्य https://tinyurl.com/5ez3948c गोपीचंद पडळकर आणि मंगळसूत्र जाईल तिथं समीकरण पाठ सोडेना, पण तो प्रसंग आहे तरी काय? सदाभाऊ खोतांनी स्टार्ट टू एंड सांगितली स्टोरी https://tinyurl.com/3apcvune
6) वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा, नाव न घेता राज ठाकरेंचा भाजपवर प्रहार, म्हणाले, कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र? https://tinyurl.com/ts78nffk आमदार जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभे राहिले ते वाखाणण्याजोगे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4phfywzh आरोपींच्या गाडीत हत्यारं, जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, माझ्याकडे पक्की माहिती; शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/4pnn7h6j
7) मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आमदार रोहित पवारांचा संताप, आवाज खाली, आवाज खाली म्हणत पीएसआयवर चिडले, घटना कॅमेरामध्ये कैद https://tinyurl.com/32a6u9fx राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन्स घेऊन येता का? आमदार रोहित पवारांविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी https://tinyurl.com/muhk775t
8) सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदललं, इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर, मंत्री छगन भुजबळ यांची विधानसभेत माहिती https://tinyurl.com/3jjpsjvm मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिले ,आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचे निलंबन, मंत्री अशोक उईके यांची विधानसभेत माहिती https://tinyurl.com/5h5prchn अनाथ मुला-मुलींसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय; शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत https://tinyurl.com/dys8pm67 मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा https://tinyurl.com/6djvv74h
9) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांविरुद्ध अमेरिकन जनता पुन्हा रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन https://tinyurl.com/32mk5759 छत्तीसगडमध्ये ईडीकडून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेलला अटक, दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही अटक https://tinyurl.com/ycu2vvv7
10) ना आलिया, ना दीपिका, 40 वर्षीय प्रियंका चोप्रा ही भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, 4 वर्षात बॉलिवूडमध्ये एकही सिनेमा नाही https://tinyurl.com/534ydktr
सलमान खान नाही, तर बिग बी अमिताभ बच्चन हे दिग्गज 'टेलिव्हिजनचा सर्वात महागडे होस्ट, KBC 17 च्या प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटींचं मानधन https://tinyurl.com/5hc449fs
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























