(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2024 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2024 | रविवार*
1. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे, अमित शाह यांच्यासोबत एक बैठक झाली; आमची आणखी एक संयुक्त बैठक होणार; साताऱ्यातील पत्रकार परिषदेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती https://tinyurl.com/mryzunb8 देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; तब्येतीची विचारपूस केली; काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातून मुंबईत परतले https://tinyurl.com/ka3cdfvr ताप ओसरला, एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला; तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेसमोर https://tinyurl.com/2s3ar6tp
2. एकनाथ शिंदेंची तब्येत नाजूक, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? खासदार संजय राऊतांनी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना डिवचलं https://tinyurl.com/msykkr5x इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती; संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/3psupmth
3. अजितदादांनी बारामतीच्या विधानसभेची निवडणूक जिंकली, पण पिक्चर अभी बाकी है! आक्षेप घेत युगेंद्र पवारांचा निवडणूक आयोगाकडे मत पडताळणीसाठी अर्ज https://tinyurl.com/mbhm59uc अजितदादांविरोधात पराभवानंतर युगेंद्र पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! सुरू केला आभार दौरा https://tinyurl.com/45xpzez7
4. विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात https://tinyurl.com/3ayw26sj ईव्हीएममध्ये गडबड, VVPAT मधील सर्व चिठ्ठ्या मोजा, आंतरराष्ट्रीय स्तरावर EVM ची तपासणी करा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी https://tinyurl.com/37nycakp
5.अजितदादा आमच्यामध्ये आले नसते तर 100 जागा आल्या असत्या, शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2ae392jc गुलाबरावांनी गुलाबराव सारखं राहावं त्यांनी जुलाबराव होऊ नये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/ms77zp4a
6. माळशिरसमध्ये वेगळाच पॅटर्न, मारकडवाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम, गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार https://tinyurl.com/4hk5dxu6 आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली https://tinyurl.com/545f62r8
7. प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य https://tinyurl.com/3b74swse मोहन भागवत म्हणतात पोरं पैदा करा, ते काही स्कीम आणणार आहेत का? एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा खोचक सवाल https://tinyurl.com/sjjkbfvt
8. बस चालकाकडून पूर्वी 7 वेळा अपघात; गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणी मोठी माहिती, चालकावर निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/mye42r79 शिवशाही बस अपघात प्रकरणी परिवहन विभागाची मोठी माहिती; निष्पापांचा बळी घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा https://tinyurl.com/pfcw7ncy
9. आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त https://tinyurl.com/4fef7se9
10. WTC फायनल शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर; आता भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये असणार चुरस https://tinyurl.com/y8npphbf आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, आयसीसीचे नेतृत्व करणारे पाचवे भारतीय ठरले https://tinyurl.com/2cw383jx
*एबीपी माझा स्पेशल*
CIBIL अपडेट ते तक्रार निवारण, CIBIL Score बाबत RBI चे 6 नवीन नियम https://tinyurl.com/y376dkne
सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 85 हजार, कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता? https://tinyurl.com/4kvamtb2
*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w