एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2020 | रविवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2020 | रविवार
1. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आज मनसेचा मोर्चा, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत, आझाद मैदानात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक, पक्षसंघटना बळकट करण्यासाठी विचारविनिमय, सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन
3. ज्यांनी इतिहासातील धडे बदलण्याचा प्रयत्न केला त्या सरकारलाच आम्ही बदललं; शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजप सरकारवर टीका
4. कृषी कर्जमाफीच्या हिशेबात बँकांकडून गडबड, शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर बच्चू कडूंचा अहवाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडूनही दखल
5. महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार आणणार, मग दिल्लीत जाणार, शिवसंग्रामच्या कार्यक्रमात फडणवीसांचा निर्धार, ठाकरे सरकारला स्थगिती सरकारची उपमा
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन | 09 फेब्रुवारी 2020 | रविवार
6. सोलापूर तालुक्यातील बोरामणी विमानतळासाठी 50 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
7. दिल्लीत अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत, भाजपला अपेक्षित यश नाही
8. जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद तर दोन जखमी
9. विषाणूजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी देशात विषाणू संशोधन संस्था उभारणार, लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांची माहिती
10. चीनमधील कोरोनाच्या मृतांचा आकडा 803वर, तर जपानमध्ये क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले, क्रूजमधील 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement