स्मार्ट बुलेटिन | 8 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा
आजपासून मिशन बिगिन अगेनअंतर्गत फेज 3 नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता, 10 टक्के कर्मचाऱ्यांसह खासगी आस्थापने उघडण्यास परवानगी
संजय राऊत यांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद ‘मातोश्री’वर; वादावर पडदा पडण्याची शक्यता
औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील उपचार घेत असलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले, शोध सुरु
कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई
खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या सरकारच्या धोरणावर 'आयएमए'कडून प्रश्नचिन्ह
कोणताही आजार नसताना लाखोंची बिले आकारली, ठाणे महापालिकेचा दोन खाजगी रुग्णालयांना दणका, 16 लाख रुपये दंडाची कारवाई
पर्यटकांचा हिरमोड होणार, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भुशी डॅमसह इतर पर्यटनस्थळांवर बंदी कायम
महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची बालकं कोरोनामुक्त; सोलापुरात जन्माच्या तेराव्या दिवशी कोरोनावर मात!
राज्यात काल 3007 कोरोना रुग्णांची नोंद, तर 1924 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण आकडा 85 हजार 975 वर
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 70 लाखांवर, 4 लाखांहून अधिक बळी तर 34 लाख बरे झाले