(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 3 फेब्रुवारी 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाठिंबा की विरोध? सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर चर्चांना उधाण, तर एनआरसीवरुन राज्य आणि केंद्रात संघर्षाची चिन्ह
2. देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात 15 कोटी 51 लाख रुपयांचा जाहिरात खर्च; फक्त टीव्ही आणि रेडिओच्या जाहिरातींचा समावेश
3. जामिया विद्यापीठात रात्री पुन्हा एकदा गोळीबार, विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 वर गोळीबार, गेल्या चार दिवसांतील तिसरी घटना
4. मुंबईत एलजीबीटी समुदायाच्या रॅलीत शर्जीलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा किरीट सोमय्यांचा दावा, व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून सखोल चौकशीची सोमय्यांची मागणी
5. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात वॅगनआर गाडी विहिरीत पडून अपघात, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 फेब्रुवारी 2020 | सोमवार | ABP Majha
6. बीड, परभणी आणि हिंगोलीत अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
7. नागपूर हत्याकांडाचा 35 दिवसांनी उलगडा, आरोपींनी मृतदेह आणि बाईक पुरून पुरावाच नष्ट केला, पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटातून प्रेरणा
8. जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव, कोरोना व्हायरसची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळला
9. टीम इंडियाची न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी; अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही टीम इंडियाची यजमानांवर सरशी, मालिकेत 5-० असं निर्विवाद वर्चस्व
10. अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर नोवाक ज्योकोविचचं वर्चस्व, रंगतदार सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमवर मात