स्मार्ट बुलेटिन | 24 ऑक्टोबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, मंत्रिमंडळात कोणतेही बदल नाही, शरद पवारांकडून स्पष्ट, शक्तिप्रदर्शन करत खडसे आज जळगावला रवाना होणार
2. भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर, भाजपला आणखी एक धक्का, गीता जैन आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
3. राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंविरोधात शिवसेना आमदार योगेश कदम यांचा हक्कभंग प्रस्ताव, दापोलीतील विकासकामांच्या भूमिपूजनांना निमंत्रण देत नसल्याची तक्रार
4. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची मदत जाहीर, जिरायतसह बागायतीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार तर फळ पिकांना 25 हजारांची मदत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा विरोधकांचा आरोप
5. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांत मिळणार, काळाबाजार रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा निर्णय, खासगी रुग्णालयातील रुग्णांना दिलासा
6. राज्यात मंदिरं खुली करण्यासाठी भाजपकडून दसऱ्याचं अल्टिमेटम, विश्व हिंदू परिषदेचा राज्यभरात महाजनआंदोलनाचा पवित्रा, मंदिराचं टाळं तोडण्याचा इशारा
6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई, घरीच ईद साजरा करण्याचं आवाहन
8. महापारेषणमधील 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदं भरण्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश, लॉकडाऊनमध्ये तरुणांना नोकरीची संधी
9. जेट एअरवेज पुन्हा आकाशात झेपावण्याची शक्यता, कलरॉक कॅपिटल आणि जालानच्या रिवायव्हल प्लॅनला मंजुरी, आर्थिक चणचणीमुळे जेट एअरवेज दीड वर्षांपासून बंद
10. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चेन्नईचा 10 विकेट्सनी धुव्वा; डीकॉक-किशनची अभेद्य सलामी, सातव्या विजयासह मुंबई गुणतालिकेत टॉपवर