एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2020 | रविवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 फेब्रुवारी 2020 | रविवार
-
- हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर य़ांच्या समर्थनार्थ आज अकोले बंद, इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, भजन दिंडी आणि निषेध सभेचं आयोजन
- राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक, दुपारी पत्रकार परिषद होणार
- सीएएवरुन महाविकास आघाडीत सुरू झालेल्या धुसफुसीची शरद पवारांकडून दखल, वर्षावर मुख्यमंत्र्यांशी खलबतं, वादग्रस्त वक्तव्य टाळण्यावर एकमत
- 15 कोटी 100 कोटींवर नव्हे तर भाजपतल्या शंभरांवर भारी, चिथावणीखोर वक्तव्यावर वारिस पठणांची शब्दांची कोटी, वादग्रस्त वक्तव्यही मागे
- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल घोषणा देताना हात न उंचावणाऱ्या नवाब मलिकांचा रायगडावरचा व्हिडीओ व्हायरल, भाजप-मनसेची टीका, घोषणेला प्रतिसाद दिल्याचा मलिकांचा दावा
- स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून विशिष्ट भाग वगळण्याचं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही, अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, छळाचा प्रसंग न दाखवण्याचं अर्जुन खोतकरांचं आवाहन
- रेल्वेत नोकरी देण्याचं आमिष देऊन 96 लाखांची फसवणूक, मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक, आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता, प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती
- ENBA पुरस्कारात एबीपी माझाचा डंका, सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रमासाठी पुरस्कार, तर पूरपरिस्थितीतील सर्वोत्कृष्ट कव्हरेजसाठीही माझाचा गौरव
- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या राज्यातील 63 क्रीडारत्नांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरव, पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement