एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 22 जून 2019 | शनिवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा
- मोठ्या प्रतीक्षेनंतर मराठवाड्यातील काही पट्ट्यात जलधारा, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस, सोलापुरातही पावसाचं आगमन
- महाराष्ट्रात एकाच दिवशी चार जिल्ह्यात भूकंप, सातारा सांगलीनंतर काल संध्याकाळी नांदेड-यवतमाळमध्येही भूकंपाचे धक्के, किनवटमध्ये अनेक घरांना भेगा
- अन्न नागरी पुरवठा खातं जयकुमार रावलांनी नाकारलं, कमी वेळात परफॉर्मन्स देणं शक्य नसल्याचं कारण, संभाजी पाटील निलंगेकरांकडे अतिरिक्त कार्यभार
- सत्कार सोहळ्यात व्यस्त न होता मंत्रिपदाला न्याय द्या, भाजपच्या बैठकीत नवनिर्वाचित मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सूचना
- मंत्रालयात दुषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्या, पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
- वातावरणातील बदलामुळे राज्यात लहान मुलांमध्ये दमा बळावला, मुंबईत दहा वर्षांत 10 टक्क्यांनी वाढ, तर बालमृत्यूचं प्रमाणही वाढलं
- बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला पोलिसांकडून बेड्या, साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक, आज न्यायालयात हजर करणार
- बँकांवरील सशस्त्र दरोड्यांचे प्रमाण वाढले, सुरक्षा वाढवण्याची बँक संघटनांची मागणी
- नाशकात पोलीस कर्मचाऱ्याकडून दोन सावत्र मुलांची गोळ्या घालून हत्या, गोळीबार केल्यानंतर आरोपी पंचवटी पोलिसांना शरण
- विश्वचषकाच्या मैदानात आज टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानशी, विजय शंकरचा दुखापतीतून सावरल्याचा दावा, तर धवनच्या जागी रिषभ पंत खेळण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement