(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 20 जानेवारी 2021 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी, इतर राज्यांनाही पक्षकार करण्याची मागणी सरकार करणार
2. राज्यातील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार, थकबाकी वाढल्याने महावितरणचा निर्णय
3. दहा महिन्यांनी नाशिकमधील खासगी क्लासचं टाळं उघडणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा, इतर जिल्ह्यातील क्लास अद्याप बंदच
4. जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, 2021-22 साठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द
5. शरद पवार कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होणार, महाविकास आघाडी सरकारचाही पाठिंबा, 25 जानेवारीला राजभवनपर्यंत मोर्चा निघणार
6. सोलापुरातील पिलीव घाटात एसटी बसवर दगडफेक, बस मागून येणाऱ्या दुचाकीवरील दोघे दगडफेकीत जखमी
7. शेजारच्या देशांना भारताकडून लसीचा पुरवठा; नेपाळ, भूतान, बांगलादेशसाठी आजपासून लसीची निर्यात सुरु
8. महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी यंदा राजपथावर संत परंपरेवर आधारित चित्ररथ
9. समारोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्याचा निषेध, जो बायडन यांनाही शुभेच्छा
10. ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर टीम इंडियासमोर इंग्लंड दौऱ्याचं आव्हान, संघाची घोषणा; कोहली, पांड्या, ईशांत शर्माचं कमबॅक