स्मार्ट बुलेटिन | 19 जानेवारी 2021 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यात आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात, आठवड्यातून 4 दिवस लसीकरण करण्यात येणार, मुख्यमंत्र्यांकडून लसीकरणाचा आढावा
2. ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याचा सर्व पक्षांचा दावा, 6 हजार ग्रामपंचायतींवर भाजप ठाम, तर 80 टक्के ग्रामपंचायती महाविकासआघाडीकडे, थोरातांची प्रतिक्रिया
3. ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणाईचा धुरळा, सोलापुरातील मोहोळ तालुक्याच्या घाटणे येथे 21 वर्षीय ऋतुराज रवींद्र देशमुख सर्वात तरुण विजयी उमेदवार
4. गुजरातच्या सुरतमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं रस्त्यावरील 18 जणांना चिरडलं, 13 जणांचा मृत्यू 5 गंभीर जखमी
5. बारावीचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ, 28 जानेवारीपर्यंत भरता येणार अर्ज, आधीच्या विषयानुसार परीक्षा देण्याची मुभा
6. अवैध दारु अड्ड्यांवर महिलांचा हल्लाबोल, दारुसाठा जप्त, 6 दुचाकी जाळल्या, नागपूरच्या येरला गावातील घटना
7. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आजची बैठक रद्द, उद्या बैठकीची शक्यता, ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली पोलीस आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठक
8. कडाक्याच्या थंडीमुळं उत्तर भारतात हुडहुडी, काश्मीर गोठलं, 30 वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद
9. ब्रिस्बेन कसोटीत रोहित शर्मा स्वस्तात माघारी, ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघ मैदानात
10. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी 'तांडव' वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक आणि कलाकार टीकाकारांच्या निशाण्यावर