![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
स्मार्ट बुलेटिन | 18 जानेवारी 2021 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 18 जानेवारी 2021 | सोमवार | ABP Majha ABP Majha Smart Bulletin for 18th January 2021 latest updates स्मार्ट बुलेटिन | 18 जानेवारी 2021 | सोमवार | ABP Majha](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/18160859/SMART_BULLETIN_1801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. राज्यभरातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा आज निकाल, मतमोजणीचं सर्वात जलद आणि अचूक कव्हरेज 'एबीपी माझा'वर
2. अहमदनगरमध्ये थोरात आणि विखे पाटलांमध्ये चुरस, खान्देशात खडसे-महाजन, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील, मोहिते पाटील, तर कोकणात राणेंची प्रतिष्ठा पणाला
3. निवडणुकांना सामोरं जाणाऱ्या आदर्श गावांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष, बिनविरोध निकालांची परंपरा खंडित झाल्यानं उत्सुकता शिगेला
4. ग्रामपंचायतींच्या निकालानंतर विजयी मिरवणूक, गुलाल उधळण्यास मनाई; ढाबे, पानटपऱ्या रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत बंद, पुण्यात रात्री 12 पर्यंत बॅनर आणि फटाके लावण्यासही बंदी
5. आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, साडेआठ हजार पदांसाठी आज जाहिरात निघणार
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन | 18 जानेवारी 2021 | सोमवार | ABP Majha
6. जय हिंद, जय बांगला! शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवणार; संजय राऊत यांची घोषणा
7. शेतकरी आंदोलनाचा 53वा दिवस, 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रजासत्ताक दिनीही आंदोलन, शेतकऱ्यांची भूमिका
8. मुलीच्या जन्माचं हत्तीवरुन मिरवणूक काढत स्वागत, कोल्हापूरच्या चावरे गावात अनोखा सोहळा, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न
9. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटीचा चौथा दिवस, वॉर्नर आणि हॅरिसच्या दमदार सलामीनंतर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी, ब्रिस्बेन कसोटी निर्णायक वळणावर
10. प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब यांचं निधन, वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
महत्त्वाच्या इतर बातम्या :पाहा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीचे कल फक्त एका क्लिकवर 'एबीपी माझा'वर, Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Live Updates या लाईव्ह ब्लॉगमध्ये, तसेच इतर अपडेट्ससाठी 'एबीपी माझा'च्या फेसबुक पेजला आणि ट्विटर हँडलला भेट द्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)