स्मार्ट बुलेटिन | 16 जून 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास अलर्ट, 130 ते २०० मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, नाशिकमधल्या गल्ल्यांना नदीचं स्वरुप
2. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा शुभारंभ; विविध देशातील कंपन्यांसोबत 16 हजार कोटींचे सामंजस्य करार, परकीय गुंतवणूक वाढण्याचा आणि रोजगार उपलब्ध होण्याचा उद्योगमंत्र्यांना विश्वास
3. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, महाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेसची नाराजी
4. कोरोना संकटात महाराष्ट्रासाठी सकारात्मक बातमी, राज्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने रुग्ण कोरोनामुक्त, काल दिवसभरात 5071 रुग्णांना डिस्चार्ज
5. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपराज्यपालांसोबत चर्चा करणार
6. देशात नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल, आयसीएमआरच्या नावाने सर्वे व्हायरल, मात्र दावा खोटा असल्याचं आयसीएमआरकडून स्पष्ट
7. जगभरात मागील 24 तासाच 1.24 लाख नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तीन हजार जणांचा मृत्यू, जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 81 लाख 8 हजार 666 वर
8.आपत्कालीन परिस्थितीत क्लोरोक्वीन आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या वापराची मंजुरी अमेरिकेच्या एफडीएने मागे घेतली, ही औषधं कोविडवरील उपचारासाठी परिणामकारक नसल्याचा दावा
9. काल सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोन भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाकडे सोपवलं, अपघाताप्रकरणी अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा
10. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती