एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2019 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
- शिवसेना आमदारांसोबत आदित्य ठाकरेंचा मालाडच्या हॉटेलात मुक्काम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही जयपूरला आमदारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग
- सत्तास्थापनेसाठी राज्यपालांचं भाजपला निमंत्रणाचं पत्र, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेसंदर्भात निर्णय, भाजप अपयशी ठरल्यास राष्ट्रवादीचा पर्यायी सरकार देण्याचा विचार
- सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग मोकळा, वादग्रस्त जागा रामलल्लाची, मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश
- सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला, मात्र अयोध्येत 5 एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश, ओवेसी मात्र निकालावर असमाधानी
- कटुता विसरुन नवा भारत घडवूयात, अयोध्या निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया, सरसंघचालकांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून निकालाचं स्वागत, शांतता राखण्याचं आवाहन
- माझं भगवीकरण करण्याचा प्रयत्न, सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा आरोप
- मुंबईत आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग बंद तर हार्बरवर पनवेल-वाशी सेवा बंद
- करमाळ्यामध्ये विहीरीत बुडून पित्यासह मुलाचा मृत्यू, तर बीडमध्ये तलावात तोल जाऊन पडल्याने दोन मुलांचा मृत्यू
- कोल्हापूरच्या कन्येला ऑलिम्पिकचं तिकीट, नेमबाज तेजस्विनी सावंत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
- नागपूरमध्ये भारत-बांगलादेश दरम्यान आज तिसरा टी-20 सामना, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement