एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 1 मार्च 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. भारताचा ढाण्या वाघ आज मायदेशात परतणार, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं वाघा बॉर्डरवर स्वागत होणार, मात्र परतीची वेळ अद्याप निश्चित नाही 2. भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांकडून पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश, भारताने पाडलेल्या F16 विमानाने डागलेल्या अम्राम मिसाईलचे तुकडे पत्रकार परिषदेत सादर 3. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानातच, आधी नकार देणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली, भारताने पुरावे दिल्यास खटला चालवण्याचा दावा 4. पाकिस्तानच्या एकीकडे शांततेच्या वार्ता आणि दुसरीकडे गोळीबार, दोन दिवसात 35 वेळा शस्रसंधीचं उल्लंघन, पुलवामा, पुंछ, राजौरीत चकमक सुरु 5. बडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा जवान निनाद मांडवगणे शहीद, आज पार्थिवावर अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह महाराष्ट्राला निनादचा अभिमान 6. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हालअलर्ट, नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज, रत्नागिरीत मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा 7. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे शिवसेनेचं 'शिवबंधन' सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बांधण्याच्या तयारीत, आज पक्षप्रवेश, शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता 8. 'बादली' घेऊन नारायण राणेंचा 'स्वाभिमान' निवडणुकीच्या रणांगणात उतरणार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला 'बादली' चिन्ह 9. 1980 पासून 2014 पर्यंत मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत शांत का होता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, तर चुका सुधारत असल्याचा सरकारचा युक्तिवाद 10. म्हाडाचा बम्पर धमाका, महाराष्ट्रात लवकरच 11 हजार घरांची लॉटरी निघणार, तर विरारमधील घरांच्या किंमी कमी होणार, 9500 ग्राहकांना फायदा होणार
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
नागपूर























