(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 5 फेब्रुवारी 2022 : शनिवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
१. मध्य रेल्वेवर 72 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात, लोकलसेवेवर मोठा परिणाम होणार, तर कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस तीन दिवस रद्द
२. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर, आशिष शेलारांच्या खांद्यावर धुरा, समितीत नितेश राणे यांचाही समावेश
३. राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात महत्त्वाची बैठक, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याआधी शेवटची चर्चा, राज्य सरकारच्या आकडेवारीवरुन अंतरिम अहवाल सादर होणार
४. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल, दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
५. म्हाडा भरतीची परीक्षा ऑनलाईन घेऊनही गैरप्रकार, मुंबईत पवई केंद्रावर डमी उमेदवाराचा पर्दाफाश, डमी आणि मूळ उमेदवारावर गुन्हा दाखल
६. पंढरपूरमध्ये वसंत पंचमीच्या निमित्ताने विठुरायाचा विवाहसोहळा, शाही लग्न सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Vitthal Rukmini Vivah : आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते . आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी. मग या देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात लगीनघाई सुरु आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
यावर्षी संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात. गेले पंधरा दिवस 150 पेक्षा जास्त कारागीर या सजावटीची तयारी करण्यासाठी पुणे येथे झटत होती. काल सकाळी अकरा वाजल्यापासून या सजावटीला सुरुवात केली असून 60 कारागिरांनी रात्री 11पर्यंत ही लग्न सोहळ्याची सजावट पूर्ण केली.
७. देवळात नारळ फोडला म्हणून मागासवर्गीय समाजावर गावाचा बहिष्कार; लातूरमधील लाजिरवाणी घटना
८. भारताला मोठं यश! 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला अटक
९. पंतप्रधान मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर, संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंचीच्या पुतळ्याचे होणार अनावरण
१० . अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंडचा सामना, यंग टीम इंडियाला पाचव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी