(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 ऑगस्ट 2021 | मंगळवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 3 ऑगस्ट 2021 | मंगळवार | ABP Majha
1. आजपासून 22 जिल्ह्यांत दुकानं-मॉल, सलून, जिम रात्री 8 पर्यंत सुरु राहणार, सर्व कार्यालयात 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस मुभा, मात्र थिएटर, मंदिरांचे दरवाजे बंदच
2. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या ११ जिल्ह्यांत निर्बंध कायम, नियमांबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला
3. मुंबईतली सर्व दुकानं, कार्यालयं रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा, फक्त हॉटेल 4 पर्यंतच सुरु राहणार, तर पुण्यात निर्बंध जैसे थेच ठेवल्यानं व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी
4. पूर्ण लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा मानस, महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती, टप्प्याटप्प्यानं एन्ट्री मिळण्याची शक्यता
5. मूल्यमापन पद्धतीनं आज राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर होणार, 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
6. पुढील दोन महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अलर्ट, विदर्भात सरासरीपक्षा कमी पावसाची शक्यता
7. राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा मानस, काल पुण्यात पार पडलेल्या बैठकीत ऐतिहासिक ठराव
8. राज्यात काल दिवसभरात 4 हजार 869 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 8 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज
9. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा; राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचं राऊतांचं ट्वीट
10. पाय गमावलेल्या 14 वर्षीय साक्षी दाभेकरला शिवसेनेकडून सव्वा लाखाची मदत, तर साक्षीला ऑटोबॉक्स पाय बसवणार, संपूर्ण खर्च मुंबई महापालिकेच्या निधीतून होणार