Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 नोव्हेंबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
Smart Bulletin : दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगभर चर्चा, B 1 -1-529 वर लस परिणामकारक ठरणार का? याची वैज्ञानिकांना चिंता, आफ्रिकेतून येणाऱ्यांना अनेक देशात बंदी
कोरोनाच्या एका नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात नवीन माहिती देताना दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली आहे. वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ जी ओलिवेरा यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती आली आहे. "दुर्दैवाने आम्हाला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना संक्रमणाचे कारण आहे."
2. भारत-बांग्लादेश सीमेवर शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के, 6.3 रिश्टर स्केलची तीव्रता, महाराष्ट्रातील रत्नागिरीतही भूकंपाचे सौम्य धक्के
3. राज्यातील पहिलीपासून सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून सुरु, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, एसओपी लवकरच जाहीर होणार, पालक आणि विद्यार्थी नियमावलीच्या प्रतीक्षेत
4. कामावर रुजू होण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अल्टिमेटमचा अखेरचा दिवस, सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा, तर अनेक आगारात एसटी वाहतुकीला पोलीस संरक्षण
5. चाळीसगावातील कन्नड घाटात आमदार मंगेश चव्हाणांकडून वसुली करणाऱ्या पोलिसांचं स्टिग ऑपरेशन, ड्रायव्हरचं सोंग घेऊन केला पर्दाफाश
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 नोव्हेंबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
6. अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत फाळणीचं दुःख सलतच राहणार, नोएडातील कार्यक्रमात सरसंघचालकांचं वक्तव्य, फाळणी हा राजकीय नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न असल्याचं मत
7. EWS आरक्षणासाठीच्या आठ लाखांच्या उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार, येत्या चार आठवड्यात नवी मर्यादा ठरणार, मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या स्थगितीची शक्यता
8. ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी; खारेगाव उड्डाणपूल डिसेंबरमध्ये सुरु होणार? वादामुळे झालाय विलंब
9. आज संविधान दिन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना संबोधन
10. कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाची 4 बाद 258 धावांची मजल; श्रेयस अय्यरचं पदार्पणातच नाबाद अर्धशतक, रवींद्र जाडेजासह अभेद्य शतकी भागीदारी