(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 25 डिसेंबर 2019 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. एनपीआर आणि एनआरसीचा एकमेकांशी संबध नाही, गृहमंत्री अमित शाहांकडून स्पष्ट, हिंसक आंदोलनांदरम्यान लोकांशी संवाद साधण्यात कमी पडल्याची गृहमंत्र्यांची कबुली
2. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आणि शिवभोजन योजनेला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी, दोन्ही योजनांसंदर्भातली नियमावली जाहीर
3. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेण्याची विनंती
4. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा, मुंडन घटनेनंतर आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन, तर जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर
5. 'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' योजनेतील बक्षीस घेण्यास मुंबईकरांचा नकार, 155 तक्रारदारांपैकी 80 जणांनी बक्षीसाचे पैसे नाकारले
6. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू नपुंसक आहेत, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, NRC च्या समर्थनार्थ 30 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार
7. आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकलेल्या वाहन कंपन्यांकडून ग्राहकांना मोठ्या ऑफर्स, कारखरेदीवर 20 हजार ते 5 लाखापर्यंत सूट
8. व्यभिचारी पत्नी ही घटस्फोटानंतर पोटगी मागण्यासाठी पात्र ठरत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, याचिकाकर्त्या घटस्फोटीत महिलेला दिलासा देण्यास नकार
9. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटील मास्टर सुनील गावस्कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदिच्छा भेटीसाठी मातोश्रीवर, सुरक्षेत कपात केल्यामुळे भेट घेतल्याची चर्चा
10. जगभरात आज नाताळचं सेलिब्रेशन, माऊंट मेरीसह सर्व चर्चना आकर्षक रोषणाई, बच्चे कंपनीला भेट देण्यासाठी सान्ताक्लॉज सज्ज