एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 मे 2021 | सोमवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- दहावीच्या परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, सूत्रांची माहिती; हायकोर्टात भूमिका मांडण्याआधी शिक्षणमंत्री महाआधिवक्त्यांशी चर्ची करणार
- घरीच प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका घेऊन जा, पाच दिवसांनंतर शाळेत परत आणून द्या; छत्तीसगड सरकारच्या परीक्षा पॅटर्नची देशभरात चर्चा
- अॅलोपॅथी उपचारांबाबत केलेलं वक्तव्य रामदेव बाबांकडून मागे, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली होती नाराजी
- मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
- कोरोनातून बरे झाल्यावर गॅंगरिनचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा, काळजी घेण्याचं आव्हान
- राज्यात काल दिवसभरात 29 हजार 177 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, 26 हजार 672 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
- मुंबई पालिकेकडून लसीकरणाचं वेळपत्रक जाहीर, आजपासून 26 मेपर्यंत थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस; तर 27 ते 29 मे रोजी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना डोस मिळणार
- कडक लॉकडाऊनमुळे खोळंबलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरु होणार, नियमांसह नाशिमधल्या बाजार समित्या सुरु, कांद्याला काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
- कोरोनामुळे राज्यात 195 मुलांनी आपल्या पालकांना गमावलं, नंदुरबार जिल्ह्यात 98 मुलं अनाथ, तर हिंगोलीत 18 मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपलं
- केंद्र सरकारने पुन्हा शेतकर्यांशी चर्चा करावी; 26 मे रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाला 12 पक्षांचा पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement