एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 20 मार्च 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 1. 7 वर्ष 3 महिने आणि 3 दिवसांनी निर्भयाला न्याय, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाच वाजता चारही नराधमांना फासावर लटकवलं 2. अखेर न्याय मिळाला, आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींना समर्पित, दोषींना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया 3. देशात 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू', कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा 4. कोरोना व्हायरसमुळे देशात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, देशात 173 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात 5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील जमावबंदी डावलून थाटामाटात लग्न, बीडमध्ये आई-वडिलांसह भटजी, फोटोग्राफरला जेलची हवा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 मार्च 2020 | शुक्रवार | एबीपी माझा
6. सर्वोच्च न्यायालयाचा मध्य प्रदेशातील 'कमलनाथ' सरकारला झटका, बहुमत चाचणी घेण्याचे आदेश, संध्याकाळी 5 वाजता फ्लोअर टेस्ट होणार 7. जगभरात कोरोनाचं थैमान, कोरोनावर औषध शोधल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा तर मलेरियाच्या औषधाने कोरोनावर उपचार करण्यासाठी अमेरिकेची मंजुरी 8. कोरोनाच्या जनजागृतीसाठी राज ठाकरे सरसावले, सोशल मीडियामार्फत मनसैनिकांना दिले सल्ले, सांगितले नऊ उपाय 9. विमानतळच नाही तर रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जुन्या हायवेवर प्रवाशांचं स्क्रिनिंग होणार; विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती 10. मुंबईकरांनी नाही ऐकलं तर कोणत्याही क्षणी लॉक डाऊन करणार, माझा कट्ट्यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























