Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 1 फेब्रुवारी 2022 : मंगळवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं आव्हान, अर्थसंकल्पाकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा, इंधनाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज
2. सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार, एबीपी माझावर सोप्या शब्दांत समजून घ्या बजेटचा अर्थ
3. केंद्रीय अर्थसंकल्पाकडून करदात्यांनाही आशा, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबरोबरच कर रचना सुटसुटीत करण्याची अपेक्षा
4. लग्न सोहळ्यांसाठी 50 ऐवजी 200 जणांच्या उपस्थितीस मान्यता, उद्यानं, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेनं सुरु, हॉटेल-रेस्टॉरन्टच्या वेळांबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
5. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं आजपासून राज्यभरातली कॉलेज पुन्हा सुरु होणार, नागपूर, पुणे, सोलापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यातल्या शाळाही अनलॉक
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 1 फेब्रुवारी 2022 : मंगळवार
6. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊला अटक, ऑफलाईनऐवजी ऑनलाईन परीक्षेसाठी काल राज्यात ठिकठिकाणी गोंधळानंतर गुन्हा दाखल
7. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या जामिनावर आज जिल्हा न्यायालय निर्णय सुनावणार, काल दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण, जामीन फेटाळल्यास अटक अटळ
8. शिर्डी साई संस्थान, तिरुपती बालाजी देवस्थानसह देशभरातील 6 हजार अशासकीय संस्थांची विदेशी चलन खाती गोठवली, वेळेत नुतनीकरण न केल्यानं कारवाई
9. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबादसह महत्त्वाच्या 15 महापालिकांची वॉर्ड रचना आज जाहीर होणार, हरकतीसाठी आणि सूचनांसाठी 14 फेब्रुवारीपर्यंत मुदत
10. मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा 34 दिवसांनंतर एक हजाराच्या आत, दिवसभरात 960 रुग्णांची नोंद, तर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यानं निर्बंध कमी होण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha