एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 17 जुलै 2019 | बुधवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम फैसला, संपूर्ण जगाचं निर्णयाकडे लक्ष, फाशीची शिक्षा टळण्यासाठी देशभर प्रार्थना
2. मुंबईतल्या डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 21 जणांची सुटका, बचावकार्य सुरुच, दुर्घटनेच्या जबाबदारीवरुन म्हाडा आणि महापालिकेत टोलवाटोलवी
3. इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा, 'वर्षा' निवासस्थानी जाऊन आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
4. पीक विम्यावरुन शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, आज मुंबईत इशारा मोर्चा, उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार
5. जागावाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची वेगवेगळी भूमिका, निम्म्या-निम्म्या जागांची राष्ट्रवादीची मागणी, तर मागच्या विधानसभा निकालानुसार जागावाटप व्हावं, काँग्रेसची भूमिका
6. मंत्री, आमदारांप्रमाणेच आता सरपंचही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय
7. राज्य सरकारकडून शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत चौपट वाढ, 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत मिळणार
8. तब्बल 149 वर्षांनी गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा योग, मध्यरात्री 2 तास 29 मिनिटांचं खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा अनुभव
9. अभिनेते शरद पोंक्षेंची कर्करोगाशी झुंज, हिमालयाची सावली नाटकातून रंगमंचावर पुनरागमन करणार
10. महाराष्ट्राच्या विजय पाटीलची ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई, 57 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये जपानच्या युतो
ताकेशिताचा पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
बॉलीवूड
पुणे
भविष्य
Advertisement