Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 जानेवारी 2022 : रविवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. अमरावतीत राजापेठ उड्डाणपुलावर रवी राणांनी बसवलेला शिवरायांचा पुतळा अमरावती पालिका आणि पोलिसांनी हटवला, राणा दाम्पत्य नजरकैदेत तर दर्यापूरमध्ये शिवसेनेनं रातोरात बसवला महाजारांचा पुतळा
2. सेल्फ टेस्ट किट विकताना ग्राहकाची माहिती ठेवणं मेडिकल चालकाला बंधनकारक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती तर राज्यात लशींचा तुटवडा असल्याचंही वक्तव्य
3. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान
देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे.
देशात कोविड लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.
4. मुंबईतील तिन्ही लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक
5. ठाण्यातील खारेगाव पुलाच्या उद्घाटनावेळी शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई, मात्र प्रत्यक्षात पुलाचं काम अपूर्णच, एबीपी माझाकडून पर्दाफाश
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 16 जानेवारी 2022 : रविवार
6. पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची विष पिऊन आत्महत्या, एक मार्कानं संधी हुकल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची मित्रांची माहिती
7. वसईत मसाले विक्री करणारा बनला बोगस डॉक्टर, चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचे दोन्ही गुडघे निकामी, 72 जणींसोबत लिव्ह इन रिलेशन आणि 9 जणींशी लग्न
8. दोन दिवसांनी पृथ्वीवर मोठं संकट कोसळण्याचा नासाचा इशारा, पृथ्वीजवळून लघुग्रह जाणार असल्याने संकटाची शक्यता
9. न्यूझीलंडजवळच्या टोंगा समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक, जपानला त्सुनामीचा तडाखा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियालाही अलर्ट
10. दक्षिण आफ्रिकेत मालिका हारल्यानंतर कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा; बीसीसीआयला मोठा धक्का, कॅप्टनची कॅप कुणाला मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा