Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha abp majha smart bulletin 12th july 2021 latest marathi news top 10 headlines Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/12/91e1beed8f3ce9d316128f17188c51da_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. आजपासून पुढचे पाच दिवस चांगल्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, कोकणाला रेड तर मुंबईला ऑरेंज अलर्ट, कालपासून विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग
2. ग्रामीण भागातल्या पालकांचा शाळा सुरु करण्यासाठी कौल, तर मुंबईसह मोठ्या शहरातल्या पालकांची नकारघंटा, मुलांचं लसीकरण न झाल्यानं आरोग्यमंत्र्यांचाही विरोध
3. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे बीडमध्ये पडसाद, भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच; आतापर्यंत जिल्हाध्यक्षांकडे 74 राजीनामे सुपूर्द
4. पानशेत धरण दुर्घटनेला आज साठ वर्ष पुर्ण, जमिन गमावलेल्या कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन नाही, आज पानशेत धरण परिसरात आंदोलनाची हाक
5. दुकानांसंदर्भातील निर्बंध न उठवल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार, व्यापारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा, आर्थिक नुकसानामुळं व्यापारी नाराज
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha
6. तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत सरकारी केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरु, पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण पुन्हा दोन दिवसांनी ठप्प होण्याची चिन्ह
7. पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष रघुनाथ येमुल यांना अटक, अघोरी सल्ला देत उद्योजकाला लग्न मोडण्यास भाग पाडल्याचा ठपका
8. अंतराळ सफरीच्या शर्यतीत रिचर्ड ब्रॅन्सन यांची बाजी, ५६ मिनिटांचा ऐतिहासिक प्रवास, या आठवड्यात जेफ बेझोस अंतराळात झेपावणार
9. नोवोक जोकोविचने रचला इतिहास, इटलीच्या मॅटिओ बेरेटीनीचा पराभव करून 20 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव
10. इटलीनं दुसऱ्यांदा पटकावला युरो चषक, पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 फरकानं विजयाला गवसणी, इंग्लंडचा पुन्हा एकदा स्वप्नभंग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)