(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 ऑगस्ट 2021 बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 ऑगस्ट 2021 बुधवार | ABP Majha
1. लोकल प्रवासासाठी आवश्यक क्यूआर कोड पास प्रक्रियेला आजपासून सुरुवात, 109 रेल्वे स्थानकांवर यंत्रणा सज्ज, लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक
2. कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास, लोकलसह मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार
3. 17 ऑगस्टपासून शहरातले आठवी ते बारावी, तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरु होणार, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कडक नियमावली
4. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी उच्च न्यायालयानं रद्द केल्यानं सरकारसमोर नवा पेच, आज महत्त्वाची बैठक होणार
5. हॉटेल आणि रेस्टॉरन्टसना आज दिलासा मिळण्याची शक्यता, रात्री 10 पर्यंत परवानगी मिळण्याचे संकेत, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष
6. आयटी कायद्यातील दुरूस्तीला तात्पुरती स्थगिती का देऊ नये? मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
7. नाशिकच्या शिक्षण अधिकारी वैशाली वीर एसीबीच्या जाळ्यात, 8 लाखाची लाच स्वीकारल्याचा आरोप, तर नागपूरचे लाचखोर अधिकारी रमेशकुमार गुप्तांनाही अटक
8. औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योजक नित्यानंद भोगले यांना गुंडांची मारहाण, वाढत्या गुंडगिरीमुळं उद्योजक हैराण, तात्काळ कारवाई करण्याची मागणी
9. मित्राला मस्करीत 'ये लंबू' म्हणणं तरुणाच्या जीवावर बेतलं, भिवंडीत भररस्त्यात मित्राकडून चाकूनं भोसकून हत्या
10. अफगाणिस्तानात तालिबान्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानवर अमेरिकेचे ताशेरे, तर भारताच्या भूमिकेचं स्वागत