ABP Majha Reality Check: स्वारगेट डेपोतील प्रकारानंतर मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ बस डेपोंची अवस्था काय? ABP माझाचा रिॲलिटी चेक
ABP Majha Reality Check: स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली असून मुंबईतील एसटी स्टँडवरील सुरक्षेचा आढावा ABP माझाने घेतलाय.

Mumbai Bus Depo Safty: पुण्यातील स्वारगेट बस डेपोत 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह राज्य हादरले आहे. (Pune Rape case) या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगाराने स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीला नेत तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर स्वारगेट एसटी आगारातली सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी आणि नावापुरती असल्याचं दिसून आले. स्वारगेटमधील 23 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असताना मुंबईतील ३ प्रमुख 'मुंबई सेंट्रल', 'परळ' आणि 'कुर्ला' एसटी स्टॅडवरील सुरक्षेचा आढावा घेत रिएल्टी चेक 'एबीपी माझा' कडून करण्यात आली आहे. ( Mumbai Bus Depo)
मुंबई सेंट्रल एस टी डेपोमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम दर्शनी सुरक्षा रक्षक जागेवर नव्हते. डेपोचं काम सुरू असल्याने पूर्वी पेक्षा कमीच बस या डेपोतून सोडल्या जात असल्याची माहिती तेथील कर्मचार्यांनी दिली. डेपो परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे व नागरिकांची वर्दळ पहाटेपासूनच असल्याचे निदर्शनास आले.
मुंबई सेंट्रल एसटी डेपोची अवस्था
मुंबई सेंट्रल एसटी डेपोचा आढावा घेतल्यानंतर, मुंबईतील दुसरं प्रमुख एसटी डेपो म्हणून परळ एसटी डेपोची ओळख आहे. डेपोच्या प्रवेशद्वारावरचं सुरक्षेच्या कारणास्तव कधी काळी लावलेले मेटल डिटेक्टर बंद आणि वाळवीने पोखरलेल्या अवस्थेत आहे. मुंबई सेंट्रल डेपोचं काम सुरू असल्याने बहुतांश गाड्या परळ डेपोतून सुटतात. प्रवाशी फलाट परिसर असो की एटी उभ्या करण्यात येणारा परिसर दोन्ही ठिकाणी सिसीटिव्ही लावण्यात आले आहे. तर सुरक्षा रक्षकांचाही जागता पहारा पहायला मिळाला. मुंबई सेंट्रल एसटी डेपोचा आढावा घेतल्यानंतर 'एबीपी माझा'ची टिम परळ एसटी डेपो येथे पोहचली. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे?
कुर्ला एसटी डेपोत काय परिस्थिती?
मुंबई सेंट्रल आणि परळनंतर कुर्ला एसटी डेपोचा आढावा घेतल्यानंतर कुर्ला या तिसऱ्या प्रमुख एसटी डेपोच्या प्रमुख आणि निदर्शनीय भागात सीसीटिव्ही लावण्यात आलेले आहेत. तर सुरक्षा रक्षकही प्रत्येक इंट्री व एक्झिट पाॅटवर तैनात असल्याचे निदर्शनास आल. तसेच डेपो परिसरातील सर्व सीसीटिव्हीही सुरूअसून कुर्ला एसटी डेपोचीही सुरक्षा सुस्थितीत असल्याचे पहायला मिळाले. स्वारगेटच्या घटनेनंतर एसटी स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महिलांच्या सुरक्षेसाठी एसटी स्थानकावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं समोर येतंय.
हेही वाचा:
Pune Swargate Bus Depot : स्वारगेट केसप्रकरणी नराधमाला अजूनही अटक नाही, पोलिसांच्या आठ टीम कार्यरत

























