एक्स्प्लोर

नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल 

नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागला आहे.

पुणे : नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागला आहे. आरोग्य भरतीचा पेपर कोल्हापूरमधील राहुल पाटील यानं 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचं चव्हाणके यानं जबाबात म्हटलंय. तर नाशिक पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या आणि पोलीस अकादमी चालवणाऱ्या रवींद्र दिघे यानं पिंपरी चिंचवड पोलीस आणि नायगावमधील पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना भरती करून देऊ असं म्हटलंय. त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत.

दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पेपरफुटीच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत. 

मिलिट्री इंटेलिजन्सने सापळा लावून पकडून दिलेला सैन्यातील हवालदार अनिल चव्हाणके याने पिंपरी-चिंचवड पोलीसांना दिलेला हा जबाब आहे.  यामधे चव्हाणके आरोग्य भरतीचा पेपर त्याला कोल्हापूरमधील राहूल पाटीलने 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे सांगितलं आहे.  नाशिक पोलिस दलात कार्यरत रविंद्र दिघे नावाचा कॉन्स्टेबल जो स्वतःची पोलीस अॅकडमी देखील चालवतो. पिंपरी-चिंचवड आणि नायगाव पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपण भरती करुन देऊ असे म्हणतोय. 

अनिल चव्हणकेने पिंपरी-चिंचवड पोलीसांना जो जबाब दिला आहे त्यामध्ये आरोग्य विभागाचा पेपर त्याला 24 ऑक्टोबरला राहुल पाटील कोल्हापूर याने पाठवला होता. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी राहुल पाटीलची चौकशी केली का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

रविंद्र दिघे या नाशिकमधे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने चव्हाणकेला 8 नोव्हेंबरला फोन करुन पिंपरी-चिंचवड आणि नायगाव पोलीस भरतीचे काम आपण करुन देऊ असे सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी रविंद्र दिघेची चौकशी केली का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

प्रवीण पाटीलच्या सांगलीच्या घरातून सैन्य अधिकारी असल्याचे युनिफॉर्म मिळाले आहेत. यामध्ये काही युनिफॉर्म हे प्रवीण पाटीलच्या नेम प्लेटचे आहेत तर काही युनिफॉर्म हे सैन्यातील इतर जवानांच्या नेम प्लेटसह आहेत. ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget