एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2020 | सोमवार*
- सरकारचा मोठा निर्णय! राज्यात आजपासून संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा तर संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंसह कृषीविषयक दुकानं सुरु राहणार; रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासावर निर्बंध https://bit.ly/2JliKax
- देशांतर्गत विमानसेवा 25 मार्चपासून बंद, भारत सरकारने मोठा निर्णय तर अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक विमाने सुरू राहणार https://bit.ly/3abgy12
- महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी तर कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर; मुंबईत दहा तर पुण्यात एक नवा रुग्ण, देशात 400हून अधिकांना कोरोनाची लागण https://bit.ly/3bftO4A
- ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा , 10-15 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; तर राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन https://bit.ly/2Jb4Mro
- सरकारच्या उपाययोजनांचं राज ठाकरेंकडून कौतुक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा https://bit.ly/2QE9Etn तर सरकारने घेतलेल्या निर्णयांची गांभीर्याने नोंद घेण्याचं शरद पवारांचं नागरिकांना आवाहन https://bit.ly/3a8wWzf
- सरकारच्या वर्क फ्रॉम होमच्या आदेशाला पुण्याच्या हिंजवडीमधील टीसीएसकडून हरताळ, काम सुरुच ठेवणार असल्याची कंपनीची मग्रुरी; काम अत्यावश्यक श्रेणीतील असल्याचा कंपनीचा दावा https://bit.ly/2UujW07
- महाराष्ट्र लॉकडाऊन असूनही मुंबईकरांवर परिणाम नाही, मुलुंड टोलनाक्यावर गाड्यांच्या रांगा, नियमांचं उल्लंघन https://bit.ly/2QFt7tz; तर बीडमध्ये उपटसुंभ्य़ांना पोलिसांकडून काठीचा प्रसाद https://bit.ly/2QHvVXk
- कोरोनाचा फटका शेअर बाजाराला, पहिल्या दहा मिनिटातच सेन्सेक्समध्ये 2600 तर निफ्टीत 792 अंकाची मोठी घसरण; 45 मिनीट ट्रेडिंग थांबवलं https://bit.ly/2QE3MjO
- कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात; संपूर्ण पगार कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीला देण्याचं आनंद महिंद्रांकडून जाहीर, ट्विटरवरुन माहिती https://bit.ly/3bvwYBJ
- टोकियो ऑलिम्पिक लांबणीवर जाण्याची शक्यता, कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाकडून खेळाडूंना न पाठवण्याचा निर्णय https://bit.ly/2UsySw0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
