ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2025 | सोमवार*
*1*. देशात लोकशाहीची हत्या, मतांची चोरी लपवण्यासाठी भाजपचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर आंदोलन https://tinyurl.com/2xvu8fyb मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, तरीही तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना काढायची; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/4k82usbd जनादेश धुडकावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार, तर 100 कोटी वसुली प्रकरण जनता विसरलेली नाही; महसूलमंत्री बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्ला https://tinyurl.com/uztw6fwa
*2*. राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा, ‘हे डरपोक सरकार, व्होट चोर गादी सोड’च्या घोषणाबाजी, राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांची दिल्ली पोलिसांकडून धरपकड, धक्काबुक्कीचा आरोप https://tinyurl.com/zds8wucz मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या https://tinyurl.com/2p9tefxa आंदोलनावेळी खासदार महुआ मोईत्रांना भोवळ आली; संजय राऊत अन् राहुल गांधी मदतीला धावले https://tinyurl.com/5acfnft7
*3*. पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात; डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स येऊन दरीत कोसळली, 8 महिलांचा मृत्यू, 20 भाविक जखमी https://tinyurl.com/n6853wj3
*4*. अदिती तटकरे रायगडमध्ये, अजित पवार बीडमध्ये 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार, तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन झेंडा फडकवणार, पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना प्रशासनाकडून ध्वजारोहणासाठीची यादी जाहीर https://tinyurl.com/nsajbne3 शरद पवारांनी त्या दोघांकडून प्रयोग करुन घ्यायला हवा होता;हसन मुश्रीफांचा पलटवार, राहुल गांधींवरही टीका https://tinyurl.com/y3svaduk
*5*.देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो; लातूरमधील पुतळा अनावरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी आठवण सांगितली https://tinyurl.com/38bv8cau गोपीनाथ मुंडेसाहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं, फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत असा सल्ला दिला; वडिलांच्या आठणवीत पंकजा मुंडे भावूक, लातूरच्या सभेत अश्रूंचा बांध फुटला https://tinyurl.com/595utrc4
*6*.जैन मुनींनी कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन थेट न्यायव्यवस्थेला ललकारलं, शस्त्रं उचलण्याची भाषा; मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, 'मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही' https://tinyurl.com/4h5hfs53 कबुतरखान्यासाठी अडून बसणाऱ्या जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार, आंदोलनाची हाक, 13 तारखेला दादरमध्ये रस्त्यावर उतरणार https://tinyurl.com/y2txy9k2 कबुतरांमुळे श्वसनाचा दुर्मिळ आजार, फुफ्फुसांना डाग पडले, नामांकित रुग्णालयांनीही हात टेकले, पुण्यातील शितल मानकर यांच्या दुर्दैवी निधनाची करुन कहाणी https://tinyurl.com/4adje7cv
*7*. मराठ्यांना आरक्षण द्यायला शरद पवारांचा विरोध, त्यांना जाब का विचारत नाही? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे यांना प्रश्न https://tinyurl.com/ykua2w8d मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत एल्गार; धाराशिवमध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांचे बुकिंग, मराठा आंदोलकांचा दावा https://tinyurl.com/mutey5eb
*8*. मुंबईजवळच्या वसईमध्ये सेक्स रॅकेटचं भयाण वास्तव, एका विषयात नापास झालेली मुलगी घाबरुन कोलकातावरून वसईपर्यंत पोहोचली, 12 वर्षीय मुलीचे 200 हून अधिक जणांनी लचके तोडले! https://tinyurl.com/mua7nzwu मुंबईच्या काळाचौकीतील धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलींवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग https://tinyurl.com/yc8x72vt
*9*. मुंबईत दहीहंडीच्या सणाला गालबोट, दहिसरमध्ये सरावादरम्यान चिमुकला वरच्या थरावरुन सटकून खाली पडला, बालगोविंदाचा करुण अंत https://tinyurl.com/2kd45hhe धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं, भिमाशंकरजवळ पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू, वाचवण्यासाठी गेलेला तरुणही बुडाला https://tinyurl.com/3js6f7md ठाण्यात तलावात बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलगा बुडाला https://tinyurl.com/bdf655bv
*10*. आशिया कप आधी टीमबाबत मोठी अपडेट, हार्दिक पांड्या अजून वेटिंगवर, तर श्रेयस अय्यर फिटनेस टेस्ट पास, पण टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत सस्पेन्स https://tinyurl.com/k8ba6j87 आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 चं काउंटडाउन सुरू, उरले फक्त 50 दिवस, 5 ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/fh23w5je
एबीपी माझा स्पेशल
Exclusive वाघनख्यानंतर आणखी एक ठेवा महाराष्ट्रात, नागपूरच्या रघुजीराजे भोसलेंची लंडनमधील तलवार हस्तांतरित https://tinyurl.com/35v8n29y
विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, अत्याधुनिक सुरक्षा सुविधांची सक्ती; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य https://tinyurl.com/595vfmu8
*एबीपी माझा Whatsapp Channel -*























