स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु, आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी, 24 जुलैपासून अर्जविक्री तर पहिली मेरिट लिस्ट 4 ऑगस्टला जाहीर होणार
2. कोरोना लसीचं 95 टक्के काम पूर्ण, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा दावा, संशोधन यशस्वी झाल्यास लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याचा अंदाज
3. राज्यात काल दिवसभरात 7 हजार 188 जण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 56 टक्क्यांवर तर 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद
4. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पार, 90 लाखांहून अधिक जणांची कोरोनावर यशस्वी मात, आजवर 6 लाख 17 हजार जणांचा मृत्यू
5. आजपासून 30 जुलैपर्यंत ग्रामपंचायती वगळून सांगली जिल्हा लॉकडाऊन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, नंदुरबारच्या चार नगरपालिका क्षेत्रातही लॉकडाऊन6. ठाण्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम, कोरोना रुग्णसंख्येत घट, नवीन रुग्णांचा आकडा 450 वरुन 187 वर
7. कोरोनावर जळगावकरांचा यशस्वी लढा, मृत्यूदर 13 वरुन 4.9 टक्क्यांवर, जिल्हा आणि मनपा प्रशासनाच्या प्रयत्नांना यश
8. राज्यात सरकार विरुद्ध विरोधक वातावरण तापलं, विरोधी पक्षनेत्यांच्या बैठक आणि दौऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, राज्य सरकारचा जीआर
9. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अमरनाथ यात्रा रद्द, भाविकांसाठी सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण होणार
10. आयपीएल दुबईत आयोजित करण्याबाबत हालचाली सुरु, आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांची प्रतिक्रिया, येत्या दहा दिवसात निर्णय