राज्यात मंत्री असतो तर मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल बांधलो असतो: नितीन गडकरी
ABP Ideas Of India : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल बांधले असते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
ABP Ideas Of India : मुंबईतील वाहतूक कोंडीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन मजली उड्डाणपुलाचा पर्याय सुचवलाय. मी जर राज्याचा मंत्री असतो तर मुंबईमध्ये तीन मजली उड्डाणपूल बनवलं असतं असं नितीन गडकरी म्हणाले. एबीपी माझाच्या आयडीया ऑफ इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "मी मुंबईत अनेक दिवसांनी आलो. माहिमच्या उड्डाणपूलावरून मी येताना ट्रॅफिग जॅम मध्ये फसलो, त्यामध्ये 20-25 मिनीटे गेली. 1995 ला राज्यात सत्ता असताना मी मंत्री होतो, त्यावेळी मी अनेक उड्डाण पूल बांधली. ते जर आज नसते तर या कार्यक्रमात पोहोचायला आणखी एक तास उशीर झाला असता."
मुंबईत लोकसंख्या इतकी वाढली आहे की त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तीन मजली उड्डाणपूल बांधणं आवश्यक आहे. पहिल्या तीन मजल्यावर रस्ते असतील आणि त्यावर मेट्रो असेल असं नितीन गडकरी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी सर्वाधिक अत्यावश्यक गोष्ट आहे ती म्हणजे गुड गव्हर्नस. त्याचसोबत अंत्योदय हेही आवश्यक आहे. ज्या गरीबांकडे अन्न, वस्त्र आणि निवारा नाही त्यांच्यापर्यंत विकास पोहोचणे आवश्यक आहे. याच गोष्टींवर भाजपने उत्तर प्रदेशमध्ये काम केलं.
नितीन गडकरी म्हणाले की, देशात हिंदुत्वाला चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्शन केलं जातंय. धर्माच्या आणि जातीच्या नावावर तसेच लिंगाच्या नावावर भेदभाव मान्य नाही. हिंदू ही जन्म पद्धत आहे. धर्माचे नाव हे कर्म आहे. आमच्या सरकारने जाती, धर्म आणि भाषेच्या नावावर कधीही भेदभाव केला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- ईडीने फुटबॉलचा खेळ सुरू केलाय.., आता हाफ टाईम झाल्यानंतर बघुयात काय होतंय ते; मामावरील कारवाईनंतर भाच्याची प्रतिक्रिया
- ABP Ideas Of India : अनेक राज्यांत पर्यावरण-पर्यटनाला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु महाराष्ट्रात तसे नाही - आदित्य ठाकरे
- Aaditya Thackeray : 'द काश्मिर फाईल्स' महाराष्ट्रात करमुक्त नाहीच; आदित्य ठाकरे म्हणाले..