एक्स्प्लोर

ABP C Voter Survey: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर, पुढची राजकीय समीकरणं काय? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे

ABP C Voter Survey On Maharashtra Government: राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय म्हणतो ABP C Voter Survey?

ABP C Voter Survey On Maharashtra Government: महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणत गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमयी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एवढंच नाहीतर अनेक तर्क-वितर्कांनी जोर धरला आहे. असं म्हटलं जात आहे की, महाराष्ट्रात लवकरच अनेक बदल घडणार आहेत. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुट्टी होणार असल्याच्याही चर्चा जोरात सुरू आहेत. तर त्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. 

राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे सुरू आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री असं म्हणत आपल्या नेत्यांचे पोस्टर्स झळकावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री म्हणत वेगवेगळ्या जिल्ह्यात पोस्टर्स झळकावले जात आहेत. तर नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकावण्यात आले आहेत. 

अशातच या सर्व घडामोडींमध्ये एक प्रश्न उद्भवतोय की, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर काय होणार? काय नवी राजकीय समीकरणं (Maharashtra Politics) पाहायला मिळू शकतात...? पाहुयात सविस्तर... 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार झाले तर, काय समीकरणं? 

  • भाजप-ठाकरे गट एकत्र येऊ शकतात : 19 टक्के 
  • भाजप-राष्ट्रवादी हातमिळवणी करणार : 12 टक्के 
  • महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार : 19 टक्के 
  • मध्यावधी निवडणूक : 32 टक्के
  • माहीत नाही : 18 टक्के

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणात 19 टक्के लोकांनी भाजपनं उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करावी, असं म्हटलं आहे. म्हणजेच राजकीय वैर विसरून जुन्या मित्रांनी नवी सुरुवात करावी. तर 12 टक्के लोकांनी भाजप आणि शरद पवार यांच्या पक्षानं एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, असं म्हटलं आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पुन्हा सरकार स्थापन करावं, अशी 19 टक्के लोकांना इच्छा आहे. विशेष म्हणजे, जनतेचा खरा कौल कळावा यासाठी निवडणुकीचा पर्याय चांगला असेल, असं जास्तीत जास्त 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तर 18 टक्के लोकांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागल्यास महाराष्ट्रात काय होईल हेच कळत नाही.

सोमवार ते बुधवार सर्वेक्षण

सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं आहे. जलद राजकीय प्रश्नांवर अखिल भारतीय सर्वेक्षण सोमवार (24 एप्रिल) ते बुधवार (26 एप्रिल) या कालावधीत करण्यात आलं आहे. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तराखंडच्या ढगफुटीत 150 निष्पाप जीव चिरडल्याची भीती; गावची तरुणाई, उद्योजक अन् पर्यटक सुद्धा ढिगाऱ्याखाली; अवघ्या 34 सेकंदात गावाची राखरांगोळी
उत्तराखंडच्या ढगफुटीत 150 निष्पाप जीव चिरडल्याची भीती; गावची तरुणाई, उद्योजक अन् पर्यटक सुद्धा ढिगाऱ्याखाली; अवघ्या 34 सेकंदात गावाची राखरांगोळी
PMC : पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तराखंडच्या ढगफुटीत 150 निष्पाप जीव चिरडल्याची भीती; गावची तरुणाई, उद्योजक अन् पर्यटक सुद्धा ढिगाऱ्याखाली; अवघ्या 34 सेकंदात गावाची राखरांगोळी
उत्तराखंडच्या ढगफुटीत 150 निष्पाप जीव चिरडल्याची भीती; गावची तरुणाई, उद्योजक अन् पर्यटक सुद्धा ढिगाऱ्याखाली; अवघ्या 34 सेकंदात गावाची राखरांगोळी
PMC : पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पुणे आयुक्तांच्या घरातून 20 लाखांच्या वस्तूंची चोरी, आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
ख्रिस गेल आला रे... मुंबईतील 'प्रो गोविंदा' चषकाचे अनावरण; प्रथम विजेता संघास मिळणार तब्बल एवढे लाख
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं, विदेश मंत्रालयाचं ठोस प्रत्युत्तर, राहुल गांधी म्हणाले हे तर आर्थिक ब्लॅकमेलिंग
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
उद्धव ठाकरेंचा दिल्लीत, शरद पवारांच्या घरी सहकुटुंब भेट; राहुल गांधींकडे स्नेहभोजनाचे निमंत्रण
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
UPI पेमेंट मोफत सुरु राहणार का? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले...
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
मेट्रोच्या पुलावरुन कोसळलेला लोखंडी रॉड थेट धावत्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसला, पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर जीव वाचला
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन आणखी लांबणीवर; भाविकांना 10 दिवस वाट पाहावी लागणार, मंदिर संस्थानचा निर्णय
Embed widget