माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत; अब्दुल सत्तार यांचं घुमजाव
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर फिरत आहेत. या बातम्या खोट्या आसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. आहे
औरंगाबाद : मी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या जात आहेत, असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. ते आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर फिरत आहेत. त्यावर सत्तार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी सत्तार यांना राजीनाम्याविषयी, पक्ष सोडण्याविषयी प्रश्न विचारले. यावर सत्तार म्हणाले की, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, परंतु आत्ता नाही. उद्या मी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन.
सत्तार म्हणाले की, माझ्याबद्दल लोक वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत, मी राजीनामा दिल्याच्या पुड्या सोडत आहेत. त्याची माहिती मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहे. मी माझी भूमिका त्यांच्यासमोर मांडेन. त्यानंतर ते जो निर्णय घेतील. तो मला मान्य असेल. परंतु मी आत्ता त्यावर काहीही बोलू शकत नाही. वेळ आल्यावर मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. मी आज संध्याकाळी मुंबईला जाणार उद्या माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल.
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवर झळकत आहेत. परंतु या बातम्या खोट्या असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांना भाजपमध्ये जायचं होतं. पण स्थानिक समीकरणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळालं. यामुळे अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत.
30 डिसेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.
नाराज आमदार भाजपच्या संपर्कात : सूत्र भाजप नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपच्या गोटातून वारंवार म्हटलं जात होतं की, मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या, त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोणाला मंत्रीपद मिळतं, कोणाला नाही यानुसार नाराजांना कसं कुरवाळता येईल, त्यांना आपल्याकडे कसं घेता येईल, याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु झालेल्या होत्या.
मी राजीनामा दिलेला नाही, राजीनाम्याविषयी पुड्या सोडल्या : अब्दुल सत्तार | ABP MAJHA अब्दुल सत्तार हे गद्दार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची जहरी टीका | Aurangabad | ABP Majha अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा?| ABP Majha