Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुलांच्या नावानंतर आता शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव
TET Scam Aurangabad: औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्याच मुलीचे या टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
TET EXAM: राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात (Maharashtra TET Scam) आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान यात आणखी एक शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी माहिती एबीपी माझ्याच्या हाती लागली आहे. औरंगाबादच्या एका शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं ( Education Officer Daughter) नाव या घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मुलांची नावे समोर आली असतांना आता एका मोठ्या शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव या यादीत आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. असे असतांना आता खुद्द औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्याच मुलीचे या टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या पाच हजार सातशे उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतिम निकलामध्ये पात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये देशमुख यांच्या मुलीचे नाव आहे.
2019 साली झालेल्या टीईटी परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या (Pune cyber police) तपासात उघड झालं होतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून (Maharashtra State Council of Education) या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. मात्र ज्या शिक्षण अधिकाऱ्यांना टीईटी परीक्षेतील उमेदवार पडताळणीचे अधिकार आहेत त्यांच्याच मुलीचे आता बोगस उमेदवाराच्या यादीत नावं आले आहे.
महत्वाचे मुद्दे
- ज्यांच्या मुलीचे टीईटी परीक्षेतील बोगस उमेदवाराच्या यादीत नावं आले आहेत ते मधुकर देशमुख हे औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत.
- विशेष म्हणजे टीईटी पात्र उमेदवारांची पात्रता पडताळणी करण्याचा अधिकार देशमुख यांना आहे.
- मात्र आता त्यांची मुलगी नुपूर देशमुखचं टीईटी घोटाळ्याच्या यादीत नावं आलं आहे.
- यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नुपूर देशमुखवर कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
देशमुख यांची प्रतिक्रिया...
टीईटी पात्र उमेदवारांच्या पात्रेतची पडताळणी करण्याची जवाबदारी देशमुख यांच्यावर होती. मात्र पात्र नसतानाही पात्र असल्याच्या यादीत त्यांच्या मुलीचं नाव आले आहे. त्यामुळे देशमुख यांच्या मुलीचे नाव पात्र यादीत कसं आलं आणि ते कुणी आणलं याची चौकशी करण्याची गरज आहे. तर माझी मुलगी सद्या कुठेही नोकरीला नसून तिने कोणत्याही प्रकारे लाभ घेतला नसल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या...
TET Exam Scam: टीईटी प्रकारणात 3,955 पानाचे दोषारोपपत्र दाखल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI