एक्स्प्लोर

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. म्हणूनच 'आठवणीतील वारी आणि वारीच्या आठवणी'च्या माध्यमातून आम्ही वारीच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा राहिला असता. ज्याच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर चालून दिवस-रात्र एक केला ते वारकरी आज भरुन पावले असते.

कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. म्हणूनच 'आठवणीतील वारी आणि वारीच्या आठवणी'च्या माध्यमातून आम्ही वारीच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी तुमच्यासोबत जागवण्याचा प्रयत्न केला. प्रथेप्रमाणे आषाढी वारी निघाली असती तर आजचा दिवस हा वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा राहिला असता. ज्याच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचे अंतर चालून दिवस-रात्र एक केला ते वारकरी आज भरुन पावले असते.

आषाढी एकादशी.. हा दिवस महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी पर्वणीचा दिवस असतो. ज्यांना शक्य आहे असे लाखो वैष्णव जण आषाढीसाठी पंढरपुरात पोहोचताच, मात्र ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य नाही त्याच्या घराघरात आणि मनामनात आज सावळ्या विठुरायाची आराधना होत असते.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये बारा ते पंधरा लाखांच्या जवळपास भाविक येत असत. प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज एकादशीच्या दिवशी तर पंढरपूरमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नसती. दर्शन रांग आतापर्यंत पंधरा किलोमीटरपर्यंत लांब गेली असती. दोन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे असते तर लाखो विठ्ठल भक्त केवळ मुखदर्शन करुन धन्य झाले असते.

प्रथेप्रमाणे वारी निघाली नसली तरी यावर्षी संतांच्या पादुका या पंढरपूरमध्ये पोहोचल्या खऱ्या पण वारकऱ्यांविना पंढरपूर सुनेसुने वाटत होते. आजच्या दिवशी पंढरपूरमधल्या घराघरातून, गल्लीतून, रस्त्या-रस्त्यातून केवळ ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष झाला असता. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील आषाढी एकादशीसाठी हजारो पालखी आज पंढरपूरमध्ये पोहोचल्या असत्या. मात्र कोरोनाच्या या संकटामुळे राज्यभरातील केवळ नऊ संतांच्या पादुकांना वारीसाठीची परवानगी देण्यात आली होती.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

काल ज्या वेळी आळंदीहून माऊली महाराजांचे आणि वरुन तुकोबांची पादुका या एसटी पंढरपूरकडे येत होते, त्यावेळी रस्त्यात कुठे रांगोळी काढलेल्या होत्या तर कुठे एसटीवर पुष्पवृष्टी करुन ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष केला जात होता. खरंतर कोरोनाच्या संकटामुळे आषाढीसाठी पायी वारी करत जे लोक आज पंढरपूरमध्ये पोहोचले असते, त्यांना रस्त्याच्या कडेला उभं राहून माऊलींना डोळे भरुन पाहता सुद्धा आले नाही.

प्रथेप्रमाणे वारी निघाली असती तर आज चांद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता. कारण एकादशीला पंढरपूरमध्ये पोहोचलेले भाविक हे पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये स्नान करतात, त्यानंतरच पांडुरंग दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करुन आपली वारी पूर्ण करतात. आजच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुरु असलेल्या ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष संपूर्ण आसमंतामध्ये पोहोचला असता. मात्र कोरोनामुळे आज वाळवंट स्तब्ध झालं आहे तर चंद्रभागाही भक्तांविना पोरकी झाली आहे.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

आषाढीला पंढरपुरात वारकरी नाही असे मागच्या तीन पिढ्यात कुणी ही पाहिले नव्हते. मात्र कोरोना आषाढी वारीवर काळ म्हणून आला आणि शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली. वारीवर संकटं आली नाहीत असे नाही. अगदी इतिहासात प्लेग आला त्यावेळीही वारीवर बंधन आले, मात्र त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील भाविक आषाढीला पोहोचले होते. मात्र कोरोनाच्या संकटात सापडलेली एकादशी वारकरी कधीच विसरणार नाहीत.

वारी हा केवळ आध्यात्मिक सोहळा नाही तर समाजातील भेदभाव विसरुन समानतेचा धागा जोडणारा एक असा प्रवास आहे. आणि हाच वारसा राज्यभरातील लाखो लोक एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा अगदी सहज सोपवत आले आहेत. म्हणूनच जगाच्या पाठीवर आषाढी वारी हा एकमेव कार्यक्रमाचे जिथे जवळपास एक महिना शेकडो किलोमीटरचे अंतर चालून येणारी मंडळी हे कोणत्या एका धर्माची. कोणत्या एका जातीची..कोणत्या पंथाचे नसतात.. किंबहुना अनोळखी लोक एकत्र येऊन आपल्या परमेश्वरा प्रती किती एकरुप झालेले असतात हे जगाच्या पाठीवर कुठेच बघायला मिळत नाही.

आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी..आज चंद्रभागेला भक्तांचा महापूर आला असता!

खरंतर कोरोनाच्या या संकटामुळे यावर्षी आषाढी वारी निघाली नाही. मात्र याच वारीचे प्रत्येक टप्पे समजून घेताना आम्ही त्या आठवणी तुमच्यासोबत जागवण्याचा प्रयत्न केला. यावर्षी कोरोनामुळे वारी निघाली नसली तरी वारीच्या प्रत्येक टप्प्याला एक प्रथा आणि परंपरा आहे या प्रत्येक मुक्कामाला एक इतिहास आहे, तोच इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता.

वारीची महती कळण्यासाठी आयुष्यात एकदातरी वारी करावी असं म्हणतात. यापूर्वी वारीतला हा सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाच्या या संकटामुळे वारी रद्द झाल्यामुळे आम्ही वारीच्या आठवणी तुमच्यासोबत जागवल्या. पण भविष्यात पुन्हा वारीच्या आठवणी तुमच्यासमोर मांडण्याची वेळ आमच्यावर येऊ नये एवढीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना.

Ashadhi Ekadashi | ना वैष्णवांचा मेळा, ना कोणतीही लगबग; आषाढी एकादशी दिवशी सुन्न चंद्रभागेचा तीर
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget