एक्स्प्लोर

30 कोटी जनावरांना 12 अंकी आधार कार्ड, केंद्राची योजना

गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागानं आदेश दिले. 'गावागावात जा, शिबिरं घ्या.. हा टॅग आणि पंचिंग मशिन सोबत न्या..'

उस्मानाबाद : देशभरातल्या 9 कोटी गाई-म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचं काम मोदी सरकारनं हाती घेतलं आहे. जनावरांना 12 अंकी आधार कार्ड मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यात 30 कोटींपैकी 85 लाख जनावरांना स्वत:ची ओळख मिळाली आहे. महाराष्ट्रातही हे काम धुमधडाक्यात सुरु आहे. भविष्यात माणसांच्या आधार कार्डसारखी जनवारांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. यामागे दुधाळ जनावराची माहिती संकलित करण्याचा हेतू सांगितला जात असला तरी गोमातेची कत्तलही या युनिक नंबरमुळे थांबवता येऊ शकेल. जनावरांचा 12 अंकी युनिक ओळख क्रमांक असलेलं आधार कार्ड फायबरचं आहे. म्हणजेच न तुटणारं. कान कापला किंवा जनावरं मेलं तरच हा टॅग निघेल. गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागानं आदेश दिले. 'गावागावात जा, शिबिरं घ्या.. हा टॅग आणि पंचिंग मशिन सोबत न्या..' पंचिंग मशीन मध्ये टॅग लावायचा. पिन बसवायची आणि लहानग्यांचे कान टोचल्यासारखे जनावराचे कान टोचायचे. जनावरांना ओळख मिळवून देण्याचा मोदी सरकारचा देशव्यापी प्रयत्न आहे. या नंबरवर त्या-त्या जनावरांचा वर्ण, जात, गवळावू, देशी की देवणी की विदेशी. शिंगं सरळ का वाकडी.. शेपूट गोंडा.. जसं जनावरांचा रंग पांढरा असला तरी शेपूट काळं असू शकतं.. अशी माहिती आहे... महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातील दुधाळ आणि भाकड जनावरांची संख्या, गावात जनावरे किती, त्यातली दुधाळ किती आणि भाकड किती याची माहिती संकलीत होत आहे. . कार्डनुसार गाई म्हशीला टॅग दिल्यावर लसीकरण, रेतन, व्याली कधी, काय जन्मलं ही यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. जनावरांना स्वत:ची ओळख मिळाल्यानं विक्री व्यवहारासाठी दाखल्याची गरज नाही. हा 12 अंकी क्रमांक पुरेसा आहे. शेतकऱ्यांची दाखल्यासाठी होणारी वणवण थांबेल. टॅगवर महाराष्ट्र पशु विकास महामंडळाचं नाव आहे. म्हणजे जनावर परराज्यात गेलं तरी समजणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget