एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंदियात मुलीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या वडिलांना 24 तासात अटक
मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून आरोपी वडिलांनी गोंदियात 17 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दहावीचा मराठीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी घरी परत येत होता. त्यावेळी त्याच्यावर कुऱ्याडीचा वार करुन हत्या करण्यात आली होती.
गोंदिया : प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी अकरावीत शिकणाऱ्या प्रियकराची हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली आहे. गोंदियाच्या मोरवाही गावात बुधवारी (4 मार्च) ही घटना घडली होती. दहावीचा विद्यार्थी मराठीचा पेपर देऊन घरी येत असताना आरोपीने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
गोंदियाच्या मोरवाही गावातील 17 वर्षीय तरुण अकरावीत शिकत होता. मात्र दहावीत त्याचे दोन विषय राहिले होते. त्यापैकी मराठी विषयाचा पेपर देऊन तो घरी परत येत होता. यावेळी प्रेयसीच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला आणि तिथून पळ काढला. यानंतर तरुणाला रुग्णालयात आणलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी तीन पथकं तयार केली होती. तरुणाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असून तिच्या वडिलांना हे पसंत नव्हतं, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर यातूनच हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी तरुणीच्या वडिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. दोघांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याचं सांगत आरोपी वडिलांनी हत्येची कबुली दिली. दरम्यान आरोपीविरोधात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement