एक्स्प्लोर

30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.   ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.   काय आहे प्रकरण? कल्याणमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने 2004 मध्ये 37 एकर जमीन खरेदी केली होती. मंत्रालयात आग लागल्यानंतर कागदपत्रं जळून खाक झाल्याने संबंधित जमिनीची खरेदी प्रलंबित होती. यानंतर महसूल विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव पाठपुरावा करत होते. यादरम्यान एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांनी रमेश जाधव यांची भेट गजानन पाटीलशी घालून दिली. काम करुन देण्याच्या मोबदल्यात गजानन पाटीलने सुरुवातीला एक फ्लॅट आणि एक कोटीची मागणी केली. पाटीलने जाधव यांना चर्चेसाठी खडसेंच्या रामटेक बंगल्यावरही अनेकदा बोलावल्याचं समजतं. हळूहळू त्याची मागणी वाढ गेली आणि जमीन हस्तांतरित करण्यासाठी त्याने तब्बल 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. Khadse_PA_FIR_1 एसीबीने सापळा रचला. लाच मागितल्याची खात्री पटल्यानंतर गजानन पाटीलवर  कलम 154 अंतर्गत सोमवारी 9 मे गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र गुन्हा नोंदवल्याच्या चार दिवसांनी म्हणजे शुक्रवारी मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ त्याला अटक केली. गजानन लक्ष्मण पाटील हा मुक्ताईनगरच्या मेळ सागवेचा रहिवासी आहे.   एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण दरम्यान, "गजानन पाटील नावाची व्यक्ती माझ्या मुंबई किंवा जळगावातील कार्यालयात अधिकृत किंवा खासगीरित्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही," असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. तसंच माझ्या नावाचा गैरवापर करत असून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी," अशी मागणीही त्यांनी केली आहे.   याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, "गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अधूनमधून जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आणतात. तसंच तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याशी ओळख आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget