एक्स्प्लोर

पाकिस्तानमधील युवकावर नागपुरात गुन्हा दाखल; कारण...

तो म्हणाला, 'आप मुझे बहोत अच्छी लगी, मै आपसे बहुत कुछ बात करना चाहता हू, इसमे हम दोनो का फायदा है. आप हमे सपोर्ट करोगे क्या?' यावर महिलेने स्पष्ट नकार दिल्यावरही तो तिला त्रास देत होता.

Nagpur News : सोशल मीडियावर आपल्या पोस्ट, रील्सचे रिच, युट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुणांकडून आपल्या मित्रांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येतो. मात्र त्यात ते एकमेकांना ओळखतात की नाही किंवा त्यांना ग्रुपमध्ये अॅड व्हायचे आहे की नाही याची परवानगी न घेता त्यांना अॅड करतात. मात्र अशाच एका युट्यूबरच्या (Youtuber) ग्रुपमध्ये जोडलं गेल्याचा मनस्ताप एका महिलेला सहन करावा लागला. तिला सोशल मीडियावर (Social Media) त्रास देणाऱ्या पाकिस्तानच्या कराची येथील युवकावर नागपुरात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नागपुरातील स्थानिक युट्यूब चॅनेल चालवणाऱ्या मोहम्मद शाहिद नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सअॅप  ग्रुप तयार केला. यात 234 जण अॅड केलं. यात कामठी येथील महिलेचा समावेश होता. त्या ग्रुपवर एका अनोळखी व्यक्तीने ग्रुपवरील महिलेशी फ्रेण्डशीप करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेकडून नकार देण्यात आला. अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल केला आणि महिलेला लाजिरवाणे आणि लज्जास्पद वाटेल अशा शब्दांत बोलला. यानंतर महिलेने आपली तक्रार जुने पोलीस ठाण्यात 21 नोव्हेंबर रोजी दाखल केली. परंतु पोलिसांनी अधिक चौकशी न केल्याने फिर्यादी महिलेने 23 नोव्हेंबरला पोलीस आयुक्तांशी भेटून सायबर पोलिसांत तक्रार केली. अश्लील भाषेत मोबाईलवर बोलणारा युवक पाकिस्तानातील कराची येथील असून त्याचं नाव इमरान असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. आता या अज्ञात व्यक्तीला कसे शोधून काढतील, याची प्रतीक्षा आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

पीडित फिर्यादीने बातमीदारांशी बोलताना सांगितले की महिलेच्या परिचितांमध्ये त्या युट्यूब प्रतिनिधीशिवाय दुसरं कुणीही ओळखीचं नव्हतं. तसेच परवानगी न घेता ग्रुपमध्ये अॅड करण्यात आलं असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

असे आहे प्रकरण...

पाकिस्तानमधील कराची (Karachi, Pakistan) येथील रहिवासी इमरान नावाच्या युवकाने आपल्या मोबाईल (92-3093049221) वरुन या महिलेच्या व्हॉट्सअॅपवर 21 नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमारास मेसेज पाठवला. यावर महिलेने कुठलेही प्रत्युत्तर न दिल्याने त्याने सव्वा पाच वाजता दोन वेळा व्हॉट्सअॅप कॉल केला. परंतु, कुठलेही प्रत्युत्तर न दिल्याने सायंकाळी साडेसात दरम्यान नमूद अनोळखी मोबाईलधारकास महिलेने विचारपूस केली असता त्याने माझे नाव इमरान असून मी पाकिस्तान कराचीचा रहिवासी आहे, असे सांगून त्या व्हॉट्सअप ग्रुपचा स्क्रीनशॉट पाठवला. तसेच त्या महिलेच्या व्हॉट्सअॅप डीपीची फोटो कॉपी करुन 'आप मुझे बहोत अच्छी लगी, मैं आपसे बहुत कुछ बात करना चाहता हूं, इसमे हम दोनों का फायदा है. आप हमें सपोर्ट करोगे क्या?' असे व्हॉट्सअॅप संभाषण झाल्यानंतर महिलेने स्पष्ट नकार देत यासंदर्भात त्वरित जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी पाकिस्तानचा युवक असूनही माझ्याबाबत घडलेले प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याने मला पोलीस आयुक्तांकडे तक्रार करावी लागली असल्याचे महिलेने सांगितले.

सायबर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ

नागपुरातील सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) दररोज मोठ्या संख्येत नागरिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी, सोशल मीडिया प्रोफाईल हॅक झाले, कोणी तरी बनावट प्रोफाईल तयार केल्याचा अनेक तक्रारी घेऊन येतात. मात्र याठिकाणी पोलिसांकडून विविध कारणे देत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येते. याशिवाय आर्थिक फसवणुकीसारख्या गंभीर प्रकरणातही आता लोकांचे लाखो रुपये गेले आहे तेही परत मिळाले नाहीच. तुमचे तर एवढेच आहे सांगून तक्रारदाराला आल्यापावली परत पाठवण्याच्या अनेक तक्रारी नागरिक दररोज करत असतात.

ही बातमी देखील वाचा

Sanjay Raut : छत्रपती शिवरायांचा अपमान विसरण्यासाठी षडयंत्र, बोम्मईचं जतबद्दल वक्तव्य भाजपाची स्क्रिप्ट; संजय राऊतांचा घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Embed widget