एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये 50 वर्षीय महिलेला जिवंत जाळलं, औरंगाबादच्या सिल्लोडमधली घटना
पीडित महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजल्यानं सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष अंधारी गावात बिअरबार चालवत असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद : हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला विकेश नगराळे या नराधमानं जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे औरंगाबादच्या सिल्लोडमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका महिलेच्या घरात घुसून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संतोष मोहिते असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीला अटकही केली आहे.
पीडित महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 50 वर्षीय महिला 95 टक्के भाजल्यानं सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष अंधारी गावात बिअरबार चालवत असल्याची माहिती आहे.
हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळलं. आता औरंगाबाद जिल्ह्यातही त्यांची पुनरावृत्ती झालीय. गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या हा घटना संतापजनक आहेत. त्यामुळे असा आरोपींना कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण कऱण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज