Pune News : पुण्याच्या आजीची कमाल! 83 व्या वर्षी कॅरम स्पर्धेत जिंकलं सुवर्ण; नेटकरी म्हणाले...
एका 83 वर्षीय महिलेने पुण्यातील कॅरम स्पर्धेत पदक जिंकलं आहे आणि या आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षय मराठेने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Pune Viral News : आपण अनेकदा ऐकलं असेल (Viral) की वय हा फक्त एक आकडा आहे आणि एखाद्याला आवडत असलेल्या आणि आनंदाच्या गोष्टी करणे कधीही थांबवू नये. वयाचा आणि उत्साहाचादेखील काहीही संबंध नसतो हे पुण्यातील एका आजीनं सिद्ध केलं आहे. एका 83 वर्षीय महिलेने पुण्यातील कॅरम स्पर्धेत पदक जिंकलं आहे आणि या आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अक्षय मराठेने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
83 वर्षीय आजीने पुण्याच्या ऑल-मगरपट्टा सिटी कॅरम स्पर्धेत दुहेरी प्रकारात सुवर्णपदक आणि एकेरी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. तिने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. नातवाने आजी एका तरुणीविरुद्ध कॅरम खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात आजी चतुराईने आणि एकाग्रतेने खेळताना दिसत आहे. या व्हिडीओला 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी चांगल्या कमेंट्स देखील केल्या आहेत.
व्हिडीओवर नेटकरी फिदा
सध्या सोशल मीडियावर कधी, कोण आणि कशारीतीने व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अनेक लोक व्हायरल होण्यासाठी अनेक करामती करतात. मात्र एखादी व्यक्ती एखादा व्हिडीओ सहज शेअर करतो आणि त्या व्हिडीओची नेटकऱ्यांना भुरळ पडते. या आजीच्या कॅरम खेळाची देखील नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालताना दिसत आहे.
प्रेरणादायी आजी...
या आजीचा खेळ पाहून अनेक लोक अवाक झाले आहे. आजीने साधलेला नेम आणि आजीचा आत्मविश्वास या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अनेक लोक आजीकडून प्रेरणा घेत आहे. आजीने वयाचं भान विसरुन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यानंतर आजीसोबत खेळणारे सगळे प्रतिस्पर्धी सगळे तरुण होते. आजीचा हा नेम पाहून अनेकांनी प्रेरणादायी आजी अशा कमेट्स करत आहेत.
नातवाने शेअर केला आजीचा व्हिडीओ
आजीचा हा व्हिडीओ तिच्या लाडक्या नातवाने शेअर केला आहे. यापूर्वीदेखील नातू अक्षयने त्याच्या आजीसोबतचा कॅरम खेळताना फोटो शेअर केला आहे. त्यात तो आणि त्याचे मित्र आजीसोबत कॅरम खेळताना दिसत आहे. आजीने आम्हाला हरवलं, असं त्याने लिहिलं आहे. आम्ही आजीसोबत प्रॅक्टिस करत असल्याचं देखील त्याने लिहिलं आहे.