एक्स्प्लोर
मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी
उस्मानाबादः मराठवाड्याचा दुष्काळ यंदाच्या पावसाने धुऊन लावला असला तरी नैसर्गिक आपत्तीने मात्र 70 बळी घेतले आहेत. यामध्ये पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अतिवृष्टीने मराठवाड्यात 569 जनावरे दगावली. तर 3 हजार 998 घरं, झोपड्या, गोठ्यांचं नुकसान झालं. 19 ठिकाणच्या खाजगी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या नुकसानीचा आकडा 31 लाख 48 हजार एवढा आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे मराठवाड्यातल्या सर्वच प्रकल्पात मिळून 60 टक्के पाणी साठा झाला आहे.
मराठवाड्यात पुरात वाहून गेलेल्यांची संख्या
मराठवाड्यात वीज पडून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरात वाहून गेल्याने विविध जिल्ह्यात 33 जणांना आपला जीव गमवावा लागला.
- बीडः 14
- औरंगाबादः 3
- हिंगोलीः 3
- नांदेडः 8
- लातूरः 4
- जालनाः 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement