एक्स्प्लोर

वर्ध्यात झारखंडमधील सात अल्पवयीन मुलं ताब्यात, चाईल्ड ट्रॅफिकिंगचा संशय

वर्धा : सात अल्पवयीन मुलांना झारखंडमधून सुरतमध्ये घेऊन जात असल्याच्या संशयावरून आरपीएफ आणि जीआरपीच्या टीमने एकाला ताब्यात घेतले आहे. मालदा सुरत एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. चाईल्ड ट्रॅफिकिंग अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंड राज्यातून 7 अल्पवयीन मुलं मालदा एक्स्प्रेसमधून सुरतला जात असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ आणि जीआरपीला मिळाली होती. यामध्ये बासू तुरी या इसमाला झारखंडच्या मुलांना बिहार येथील धनबाद रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने आणून दिले. त्या मुलांना सुरतला एका व्यक्तीकडे सोपवण्यास वासू तुरी याला सांगितले. अशी माहिती चौकशीत समोर आली. यावरून प्रथम दर्शनी हा प्रकार चाईल्ड ट्रॅफिकिंगचा असल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याचं लोहमार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांनी सांगितले. मुलांच्या पालकांना बोलावून मुलांना त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. सध्या मुलांना बालगृहात ठेवण्यात आले आहे. यातील एका मुलाला विचारपूस केली असता, शाळेत जाण्याची इच्छा आहे, पण  परिस्थिती गरिबीची असल्याने काम करण्यासाठी जात असल्याच सांगितलं. कोवळ्या वयात घरातील कर्ज असल्याची परिस्थिती समजून ते काम करण्यासाठी जाण्यास तयार झाल्याचं सांगतात. आणखी एका चिमुरड्याशी संवाद साधला असता, अत्यंत धक्कादायक माहिती त्याने सांगितली. तो म्हणाला, “बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडणण्यासाठी काम करण्यास जावं लागतं. घरच्यांनीही छातीवर दागड ठेवत दोन पैसे मिळतील म्हणून कामावर पाठवलं आहे.” दरम्यान, एका आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget