एक्स्प्लोर
Advertisement
9 कोटी अपहार प्रकरणी सांगलीच्या सहा पोलिसांचं निलंबन
सांगली : चोराला हाताशी धरुन 9 कोटीच्या अपहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सांगलीच्या 6 पोलिसांचे निलंबन झालं आहे. सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली
निलंबन झालेल्या सहा पोलिसांमध्ये सहाय्यक फौजदार शरद कुरळककर, कॉन्स्टेबल शंकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील, कुलदीप कांबळे आणि पोलीस नाईक रवींद्र पाटील यांचा समावेश आहे. पण या प्रकरणात मुख्य आरोप असलेल्या सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या वर्षी मैमुद्दीन मुल्ला या अट्टल चोरट्याने वारणा कोडोली इथल्या शिक्षण समूहाच्या शिक्षक कॉलनीतून 3 कोटी रुपयांची रक्कम मिरज इथं लपवून ठेवली होती, ही माहिती सांगली पोलिसांना कळताच तपासाच्या नावाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सोबत रवींद्र पाटील, दीपक पाटील, शंकर पाटील, प्रवीण सावंत या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारणेत येऊन 6 कोटींची रक्कम चोरून नेली.
या प्रकरणाची माहिती त्याचे वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ धनवट यांनी पुन्हा दुसऱ्या पोलीसांचं दुसरं पथक तयार करत दिपक पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरपळकर याना घेऊन पुन्हा वारणा नगर येथे येऊन 3 कोटी 18 लाखावर डल्ला मारला या प्रकरणाची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिक झुंझार सरनोबत यांनी वारणा इथल्या कडोली पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून याची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
तसेच या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलं होतं. तसेच सांगली पोलिसांच्या या कारनाम्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची नाचक्की झाली असून, या प्रकरणात पारदर्शीपणे चौकशी होणार असल्याचंही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या
सांगलीतल्या 'त्या' आठही पोलिसांची CID चौकशी होणार : विश्वास नांगरे पाटील
चोरट्याला हाताशी धरुन सांगली पोलिसांचा कोट्यवधी रुपयांवर डल्ला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement