एक्स्प्लोर
नांदेडमध्ये वीज पडून 5 महिलांचा मृत्यू
नांदेड : नांदेडमध्ये आज वीजेचं तांडव बघायला मिळाला. कारण, एकाच ठिकाणी वीज पडून पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या कारला माळ परिसरात ही घटना घडली आहे.
काही महिला कामसाठी शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी अचानकपणे विजांचा कडकडाट सुरु झाला, त्यानंतर या महिला एका झाडाखाली बसल्या आणि त्याच झाडावर वीज कोसळली. त्यामुळे यात पाच महिलांना आपला जीव गमवावा लागला.
मृतांमध्ये रेखा पवळे, शोभा पवळे, शोभा जाधव, मोहनाबाई सोनवणे, शेषाबाई गंगावने यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
आज सकाळी केलेल्या परीक्षणात मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई, नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रिय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement