एक्स्प्लोर

Maharashtra on Covid19 : महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक, एकाच दिवशी 5 लाख 52 हजार नागरिकांना दिली लस

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा नवा उच्चांक स्थापित झाला आहे. एकाच दिवशी 5 लाख 52 हजार नागरिकांना दिली लस टोचण्यात आली.

मुंबई : राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करतानाच त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात 5 लाख 52 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

मुंबईत लसीकरण वेगाने
मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर 300 लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मुंबईत गर्दीचं नियोजन करता यावं याकरता 18 ते 44 वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यांपैकी राज्याच्या संमतीनं 30 ते 44 च्या वयोगटाचं लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत 18 ते 44 वयोगटात 50 लाख लोकसंख्या आहे. पुढचा एक आठवडा 2 उपगटांनुसार लसीकरण प्रक्रीयेचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवं नियोजन करणार आहोत, असं ककाणी यांनी सांगितलं. 

ककाणी यांनी सांगितलं की, गेल्या 3 महिन्यांत एप्रिल- 8 लाख 70 हजार, मे-  4 लाख 57 हजार,  जून- आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त मुंबईला लसपुरवठा झाला आहे. 75 % लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस  साठा वाढल्यास अधिक लस केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. कांदिवलीतील बनावट लसीकरण प्रकरणाबाबत ते म्हणाले की, यासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटला महापालिकेकडून बॅच क्रमांकांच्या तपासणीबाबत पत्र दिले होते. सीरमकडून उद्यापर्यंत प्रतिसाद अपेक्षित आहे. पोलिस तपास या प्रतिसादानुसार केला जाऊ शकेल, असं ककाणी यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Wari Loksabhechi Dharashiv EP 11 : ओमराजे की अर्चना पाटील? धाराशिवकर कुणाच्या मागे?CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणारCM Eknath Shinde meets Vinod Patil : भुमरेंना उमेदवारी, विनोद पाटलांची माघार, मुख्यमंत्री भेटीलाCM Eknath Shinde PC : नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार , शिवसेना तडजोड न करण्याचा भूमिकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Marathi Serial Updates :  खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
खोतांच्या घरात निशी-नीरजच्या लग्नाची लगबग; श्रीनुचे वाजणार बारा;'सारं काही... 'मध्ये येणार नवा ट्वीस्ट
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
Konkona Sen Sharma :  10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार
''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार
Embed widget