एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 42 किलोंचा मासा सापडला!
नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला.
इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तीन तरुणाने टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. उजनी धरण क्षेत्रात आजपर्यंत आढळलेला हा सर्वात मोठा असल्याचे सांगितलं जात आहे.
नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला. त्यांनी हा मासा आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यास आणला होता. माशाची काही वेळातच 130 रुपये किलो या दराने 5500 रुपयांनी शंकर मोरे यांनी मासा विकत घेतला.
उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे मासेमारी करण्यासाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मच्छिमार या ठिकाणी मासेमारी करुन आपली उपजीविका करतात. मासे मोठ्याप्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील मासेमारीत सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
मोठा मासा विक्रीला आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी या ठिकाणी भेट देऊन या माशासंदर्भात माहिती घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion